अमिताभ, अभिषेक बच्चन यांना झाला कोरोना; शाहिद आफ्रिदीनं केलं ट्विट, म्हणाला...

पाकिस्तानच्या माजी खेळाडूला झालेला कोरोना, त्यानं दिली मात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 12:28 PM2020-07-13T12:28:57+5:302020-07-13T12:29:43+5:30

whatsapp join usJoin us
Shahid Afridi sends best wishes to Amitabh, Abhishek Bachchan | अमिताभ, अभिषेक बच्चन यांना झाला कोरोना; शाहिद आफ्रिदीनं केलं ट्विट, म्हणाला...

अमिताभ, अभिषेक बच्चन यांना झाला कोरोना; शाहिद आफ्रिदीनं केलं ट्विट, म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांना कोरोना झाल्याचे वृत्त शनिवारी रात्री येऊन धडकले. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधरावी यासाठी सोशल मीडियावर अनेकांनी प्रार्थना केली. अमिताभ व अभिषेक यांना Get well soonचे अनेक मॅसेज गेले. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यानंही अमिताभ व अभिषेक यांनी कोरोनावर मात करावी अशी प्रार्थना केली. 

अमिताभ आणि अभिषेक यांच्यानंतर ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले.  एकूण 54 लोक बच्चन कुटुंबाच्या संपर्कात आले होते. बच्चन कुटुंबातील चार सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर यापैकी 28 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी 26 लोक हाय रिस्कवर होते. या सर्व 26 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तथापि या सर्वांना पुढील 14 दिवसांपर्यंत क्वारंटाईन करण्यात आले आहे. बच्चन कुटुंबाचा स्टाफ कोरोना निगेटीव्ह आढळला आहे.

तूर्तास बिग बींचे सर्व चारही बंगले सील करण्यात आले आहेत. बीएमसीने या चारही बंगल्यांना कन्टेन्टमेंट झोन घोषित केले आहे. शनिवारी अमिताभ व अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. अमिताभ यांनी स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली होती.  आफ्रिदीलाही कोरोना झाला होता आणि त्यानं त्यावर यशस्वी मात केली आहे. त्यानं लिहिलं की,''अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या पाठीशी माझ्या शुभेच्छा.. तुम्ही लवकर बरे व्हाल अशी आशा व्यक्त करतो.''
 


अन्य मह्त्त्वाच्या बातम्या

भारतीय फलंदाजाच्या घरी हलला पाळणा; झाला मुलीचा बाप! 

इंग्लंडच्या जेम्स अँडरसनकडून मोठी चूक; आयसीसी करणार कारवाई? 

विंडीजनं इंग्लंडला नमवलं; यजमानांच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

Read in English

Web Title: Shahid Afridi sends best wishes to Amitabh, Abhishek Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.