शाहिद आफ्रिदीची मुलगी हॉस्पिटलमध्ये; पाकिस्तानच्या माजी खेळाडूची लंका प्रीमिअर लीगमधून माघार

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं लंका प्रीमिअर लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: December 3, 2020 11:21 AM2020-12-03T11:21:08+5:302020-12-03T11:26:44+5:30

whatsapp join usJoin us
Shahid Afridi’s daughter admitted to hospital; makes an exit from LPL 2020 | शाहिद आफ्रिदीची मुलगी हॉस्पिटलमध्ये; पाकिस्तानच्या माजी खेळाडूची लंका प्रीमिअर लीगमधून माघार

शाहिद आफ्रिदीची मुलगी हॉस्पिटलमध्ये; पाकिस्तानच्या माजी खेळाडूची लंका प्रीमिअर लीगमधून माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं लंका प्रीमिअर लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. गॅल ग्लॅडिएटर्स संघाचा कर्णधार असलेला आफ्रिदी मायदेशी परतला आहे. आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ग्लॅडिएटर संघाला तीनपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. त्याला आता आगामी सामन्यांत खेळता येणार नाही आणि याबाबत त्यानं ट्विट करून माहिती दिली. 
आफ्रिदीनं वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतत असल्याचे सांगितले. त्यानं ट्विट केलं की,''वैयक्तिक इमरजन्सीमुळे मला घरी जावे लागत आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर मी पुन्हा LPLमध्ये परत येईन. संघाला शुभेच्छा.'' 


दरम्यान, लंका प्रीमिअर लीगच्या अधिकृत ट्विटर हँडलनं आफ्रिदीच्या मायदेशात जाण्यामागचं कारण सांगितलं. आफ्रिदीच्या मुलीची प्रकृती खराब झाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. 

शाहिद आफ्रिदीला लंका प्रीमिअर लीगमध्ये किती रक्कम मिळाली माहित्येय?; यापेक्षा जास्त IPLमध्ये युवा खेळाडू कमावतात

  • ६० हजार डॉलर ( जवळपास ४४ लाख) - दासून शनाका, कुसर परेरा, अँजेलो मॅथ्यू, थिसारा परेरा
  • ५० हजार डॉलर ( जवळपास ३६.७ लाख) - लेंडल सिमन्स, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद हाफिज, इरफान पठाण, आंद्रे रसेल, वानिदू हसरंगा डी सिल्वा, डेल स्टेन
  • ४० हजार डॉलर ( जवळपास २९.४ लाख) - सुदीप त्यागी, हझरतुल्लाह जझाई, मनप्रीत सिंग, शोएब मलिक, निरोशॅन डिकवेल, दानुष्का गुणथिलका, कुसल मेंडिस, इसुरू उदाना, अविष्का फर्नांडो
  • २५ हजार डॉलर ( जवळपास १८.४ लाख) - समिथ पटेल, मोहम्मद आमीर, जॉन्सन चार्लेस, उझ्मान शिनवारी, लाहिरू कुमार, भानुका राजपक्षा, नुवान प्रदीप, दीनेश चंडीमल, धनंजया डी सिल्वा, ओशादा फर्नांडो, अकिला धनंजया, सीकूगे प्रसन्ना, अमिला ओपोन्सो, सुरंगा लकमल, कसून रजिथा, मिलिंदा सिरवर्धना, असेला गुणरत्ने, अशान प्रियांजन, बिनुरा फर्नांडो
  • याशिवाय ११.२ लाख आणि २.२ लाख या पंक्तितही काही खेळाडू आहेत.  

Web Title: Shahid Afridi’s daughter admitted to hospital; makes an exit from LPL 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.