पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं लंका प्रीमिअर लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. गॅल ग्लॅडिएटर्स संघाचा कर्णधार असलेला आफ्रिदी मायदेशी परतला आहे. आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ग्लॅडिएटर संघाला तीनपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. त्याला आता आगामी सामन्यांत खेळता येणार नाही आणि याबाबत त्यानं ट्विट करून माहिती दिली. आफ्रिदीनं वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतत असल्याचे सांगितले. त्यानं ट्विट केलं की,''वैयक्तिक इमरजन्सीमुळे मला घरी जावे लागत आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर मी पुन्हा LPLमध्ये परत येईन. संघाला शुभेच्छा.''
शाहिद आफ्रिदीला लंका प्रीमिअर लीगमध्ये किती रक्कम मिळाली माहित्येय?; यापेक्षा जास्त IPLमध्ये युवा खेळाडू कमावतात
- ६० हजार डॉलर ( जवळपास ४४ लाख) - दासून शनाका, कुसर परेरा, अँजेलो मॅथ्यू, थिसारा परेरा
- ५० हजार डॉलर ( जवळपास ३६.७ लाख) - लेंडल सिमन्स, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद हाफिज, इरफान पठाण, आंद्रे रसेल, वानिदू हसरंगा डी सिल्वा, डेल स्टेन
- ४० हजार डॉलर ( जवळपास २९.४ लाख) - सुदीप त्यागी, हझरतुल्लाह जझाई, मनप्रीत सिंग, शोएब मलिक, निरोशॅन डिकवेल, दानुष्का गुणथिलका, कुसल मेंडिस, इसुरू उदाना, अविष्का फर्नांडो
- २५ हजार डॉलर ( जवळपास १८.४ लाख) - समिथ पटेल, मोहम्मद आमीर, जॉन्सन चार्लेस, उझ्मान शिनवारी, लाहिरू कुमार, भानुका राजपक्षा, नुवान प्रदीप, दीनेश चंडीमल, धनंजया डी सिल्वा, ओशादा फर्नांडो, अकिला धनंजया, सीकूगे प्रसन्ना, अमिला ओपोन्सो, सुरंगा लकमल, कसून रजिथा, मिलिंदा सिरवर्धना, असेला गुणरत्ने, अशान प्रियांजन, बिनुरा फर्नांडो
- याशिवाय ११.२ लाख आणि २.२ लाख या पंक्तितही काही खेळाडू आहेत.