Join us  

Shaheen Afridi Wedding: शाहीन आफ्रिदी उद्या होणार शाहिद आफ्रिदीचा जावई; कराचीत पार पडणार 'विवाहसोहळा'

Shaheen-Ansha Afridi Wedding Date: पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 3:09 PM

Open in App

Shaheen’s Wedding Date । नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी उद्या विवाहबंधनात अडकणार आहे. अलीकडेच पाकिस्तानी संघाने मायदेशात इंग्लंडविरूद्ध आणि न्यूझीलंडविरूद्ध मालिका खेळली. मात्र, दुखापतीमुळे शाहीन आफ्रिदी मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता. शाहीन आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा जावई होणार आहे. तो शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा आफ्रिदीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 

दरम्यान, उद्या होणाऱ्या लग्नासाठी शाहीन आफ्रिदी त्याच्या कुटुंबीयांसह कराचीत दाखल झाला आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, शाहीन आपल्या कुटुंबासह कराचीमध्ये आहे. 3 फेब्रुवारीला होणाऱ्या विवाह सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. बाबर आझमसह संपूर्ण पाकिस्तान संघाव्यतिरिक्त अनेक बड्या व्यक्ती या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शाहीनने जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती, जी आता पूर्ण होत आहे. अंशाशी लग्न करण्यासाठी शाहीनला बराच काळ वाट पाहावी लागली. खरं तर दोन वर्षांपूर्वी या नात्याबद्दल दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाली होती.  

उद्या होणार विवाहसोहळा अंशा ही आफ्रिदीची मोठी मुलगी आहे. शाहीनची होणारी बायको अंशा अनेकदा सामना पाहताना जगासमोर आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे 3 फेब्रुवारी 2023 रोजी शाहीन आणि अंशा यांचा विवाह होणार आहे. शाहिद आफ्रिदीने याबाबत माहिती देताना म्हटले होते, "माझी मुलगी अंशा आणि 22 वर्षीय वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आमच्या परंपरेनुसार लग्न करणार आहेत. हा सोहळा कराचीमध्ये होणार होईल. लग्नानंतर शाहीन पाकिस्तान सुपर लीगच्या आगामी हंगामात सहभागी होणार आहे. तो पीएसएलमधील लाहोर कलंदर संघाचा एक भाग आहे."

शाहीन होणार शाहिद आफ्रिदीचा जावई खरं तर शाहीन आणि अंशा यांच्या अफेयरची चर्चा माध्यमांमध्ये आल्यानंतर शाहिद आफ्रिदीने याबाबत खुलासा केला होता. "शाहीनच्या कुटुंबीयांनी माझ्या मुलीसाठी माझ्या कुटुंबाशी संपर्क साधला होता. दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आहेत. अल्लाहची इच्छा असेल तर ही जोडीही तयार होईल. शाहीनला मैदानावर आणि मैदानाबाहेर यश मिळावे यासाठी माझ्या प्रार्थना त्याच्यासोबत आहेत", असे अंशाचे वडील शाहिद आफ्रिदीने सांगितले होते. त्यानंतर लगेचच युवा शाहीनने आपल्या होणाऱ्या सासऱ्यांचे आभार मानले. त्याने लिहिले, "अलहमदुलिल्लाह. लाला तुमच्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद. तुम्ही संपूर्ण देशाची शान आहात. आता अशा प्रकारे क्रिकेटशी संबंधित दोन कुटुंबे एक होतील." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :पाकिस्तानशाहिद अफ्रिदीलग्न
Open in App