इंडियन प्रीमियर लीगच्या २०२४ च्या हंगामासाठीची लिलाव प्रक्रिया १९ डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. या लिलावासाठी सर्व १० संघांनी आपली तयारी सुरू केली आहे. तसेच बीसीसीआयनेही आयपीएलमधील सर्व संघांना आपापली रिटेंशन लिस्ट देण्यास सांगितले आहे. त्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर आहे. आता खेळाडूंच्या रिटेंशनबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
त्यामध्ये कोलकाता नाईटरायडर्सने अष्टपैलू खेळाडून शार्दुल ठाकूर याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. शार्दुल ठाकूरला केकेआरने २०२३ च्या लिलावामध्ये तब्बल १०.७५ कोटी रुपये मोजून खरेदी केले होते. त्यामुळे शार्दुलला रिलीज केल्याने केकेआरच्या पर्समध्ये १०.७५ कोटी रुपये जमा झाले आहे. गत हंगामात शार्दुल ठाकूरने काही सामन्यांत कोलकातासाठी मॅचविनिंग कामगिरी केली होती. दरम्यान, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये शार्दुल ठाकूरला लक्षवेधी कामगिरी करता आलेली नाही. त्याला केवळ तीन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती.
दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने फॉर्म आणि फिटनेसशी झुंजत असलेल्या पृथ्वी शॉ याला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कौंटी क्रिकेट खेळताना पृथ्वी शॉ याला दुखापत झाली होती. शार्दुल क्रिकेट वर्ल्ड कप में भारतीय टीम का हिस्सा थे, जहां उन्हें सिर्फ तीन मैच खेलने का मौका मिला. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी फिरकी गोलंदाज शाहबाज अहमद आणि मयांक डागर यांना परस्परांमध्ये ट्रेड केलं आहे.
शाहबाज आता एसआरएच आणि मयांक आरसीबीकडून खेळेल. तर इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट याने आयपीएल २०२४ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. रुट राजस्थान रॉयल्सकडून खेळतो.