Join us  

अवघ्या ३ षटकांमध्ये निम्मा संघ बाद; केला वर्ल्ड रेकॉर्ड; IPL आधी शाकिबनं दंड थोपटले! पाहा Video

आयपीएल २०२३ मध्ये यंदा कोणता खेळाडू चमकणार हे तर स्पर्धा सुरू झाल्यानंतरच कळू शकेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 9:17 PM

Open in App

नवी दिल्ली-

आयपीएल २०२३ मध्ये यंदा कोणता खेळाडू चमकणार हे तर स्पर्धा सुरू झाल्यानंतरच कळू शकेल. अहमदाबादमध्ये ३१ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना होणार आहे आणि १६ व्या सीझनमध्ये पुन्हा एकदा भारतासह विविध देशांच्या दिग्गज खेळाडूंवर लक्ष असणार आहे. यात काही खेळाडू स्पर्धेसाठी खूप खास ठरू शकतात आणि यात असेही काही खेळाडू असतील जे चांगल्या फॉर्मसह दमदार एन्ट्री करतील. 

कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळणारा बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन सध्या तुफान फॉर्मात आहे. शाकिबनं हे अवघ्या तीन षटकांमध्ये सिद्ध केलं आहे. 

आयपीएल सुरू होण्यापूर्वी बांगलादेशी संघ आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. बांगलादेशच्या संघातील काही खेळाडू आयपीएलमध्येही खेळताना दिसणार आहेत. यामध्ये सर्वात मोठं नाव आहे बांगलादेशचा कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन, ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने १.५० कोटी रुपयांना ताफ्यात दाखल केलं आहे. शाकिब केकेआरच्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे पण तो आल्यावर केकेआरची ताकद वाढणार आहे.

३ षटकात ५ विकेट्सबांगलादेश आणि आयर्लंड यांच्यात बुधवारी दुसरा T20 सामना खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २०२ धावांची मोठी धावसंख्या उभारली. यानंतर, कर्णधार शाकिबच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. अवघ्या ३ षटकांत आयर्लंडचा निम्मा त्यानं एकट्यानं पॅव्हेलियनमध्ये पाठवला. सहाव्या षटकापर्यंत आयर्लंडनं अवघ्या ४३ धावांत ६ विकेट गमावल्या होत्या, त्यापैकी शाकिबने ५ विकेट घेतल्या होत्या. शाकिबनं ३ षटकात केवळ १४ धावा दिल्या आणि ५ बळी घेतले.

केला वर्ल्ड रेकॉर्डशाकिबनं ४ षटकात केवळ २२ धावा दिल्या आणि ५ बळी घेतले. यासह तो आंतरराष्ट्रीय टी-२० चा नंबर वन गोलंदाज बनला. शाकिबच्या आता T20 मध्ये १३६ विकेट्स आहेत आणि त्यानं न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज आणि त्याचा KKR पार्टनर टीम साऊदीला मागं टाकलं आहे. सौदीच्या १३४ विकेट्स आहेत. शाकिबच्या गोलंदाजीच्या जोरावर आयर्लंडचा संपूर्ण संघ केवळ १२५ धावाच करू शकला आणि बांगलादेशने ७७ धावांनी विजय मिळवला.

टॅग्स :बांगलादेशआयपीएल २०२३
Open in App