बांगलादेशच्या कर्णधारपदासाठी संगीत खुर्ची! पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणाऱ्या खेळाडूची निवड

तमिम इक्बालने आधी कर्णधार पद सोडले... पंतप्रधानांनी समजावल्यानंतर त्याने निर्णय बदलला, परंतु काही दिवसांनी पाठीच्या दुखापतीचं निमित्त सांगून आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 02:44 PM2023-08-11T14:44:34+5:302023-08-11T14:44:54+5:30

whatsapp join usJoin us
Shakib Al Hasan appointed as the new Bangladesh captain for Asia Cup and the 2023 ODI World Cup. | बांगलादेशच्या कर्णधारपदासाठी संगीत खुर्ची! पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणाऱ्या खेळाडूची निवड

बांगलादेशच्या कर्णधारपदासाठी संगीत खुर्ची! पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणाऱ्या खेळाडूची निवड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

तमिम इक्बालने आधी कर्णधार पद सोडले... पंतप्रधानांनी समजावल्यानंतर त्याने निर्णय बदलला, परंतु काही दिवसांनी पाठीच्या दुखापतीचं निमित्त सांगून आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली. बांगलादेश क्रिकेट संघात हा गोंधळ सुरू असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan ) याची बांगलादेशच्या कर्णधारपदी निवड केली गेली आहे. आगामी आशिया चषक आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत शाकिबच्या नेतृत्वाखाली बांगलादेश संघ खेळणार आहे.  


बांगलादेशचा संघ सध्या अडचणीत आहे आणि अशा परिस्थिती शाकिबने ही जबाबदारी स्वीकारली आहे. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या वन डे वर्ल्ड कपपूर्वी आशिया चषक आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध घरच्या वनडे मालिकेत शाकिब संघाचे नेतृत्व करेल. शाकीब आता तिन्ही संघात बांगलादेशचा कर्णधार आहे. फॉरमॅट, गेल्या वर्षी कसोटी कर्णधार आणि ट्वेंटी-२० कर्णधार म्हणून तिसर्‍यांदा सुरुवात केली. शाकिबकडे नेतृत्व गेल्याने पाकिस्तानची डोकेदुखी नक्की वाढणार आहे, कारण त्यांच्याविरुद्ध शाकिबची कामगिरी चांगली झालेली आहे. 


२००९ ते २०११ दरम्यान शाकिबने बांगलादेशचे ४९ वन डे सामन्यांमध्ये नेतृत्व केले होते, जेव्हा तो पहिल्यांदा कर्णधार झाला होता आणि त्यापैकी २२ जिंकले होते. शाकिबने नंतर २०१५ आणि २०१७ मध्ये आणखी ३ वन डे सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्व केले. शाकीबने आतापर्यंत १९ कसोटी आणि ३९ ट्वेंटी-२०सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्व केले आहे. कर्णधार म्हणून ५२ वन डे सामन्यांपैकी शेवटचा सामना २०१७ मध्ये होता. 


पाठीच्या दुखापतीतून बरा झाला तरी तंदुरुस्तीबाबत अनिश्चिततेमुळे तमिमने बांगलादेशचे वन डे संघाचे कर्णधारपद सोडले. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमधून तो बाहेर पडला आणि २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वन  डे मालिकेसाठी आणि त्यानंतर होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपसाठी तमिम वेळेत तंदुरुस्त होण्याची आशा आहे. 

Web Title: Shakib Al Hasan appointed as the new Bangladesh captain for Asia Cup and the 2023 ODI World Cup.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.