Shakib Al Hasan, Bangladesh Murder Case: बांगलादेश क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार शाकीब अल हसन हा बऱ्याच विषयामुळे वादात सापडतो. आता तर त्याच्यावर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. अशा वेळी शाकीबला क्रिकेट सोडावे लागणार का? तुरुंगवास भोगावा लागणार का? असे विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. याच दरम्यान हत्या प्रकरणात शाकिब अल हसनला दिलासा मिळाला आहे. त्याच्यावरील आरोप निश्चित होईपर्यंत त्याला तुरुंगात टाकता येणार नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाकिब अल हसनवर ढाका येथील कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप आहे. हा आरोप झाला तेव्हा तो रावळपिंडी येथे पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत होता. शकिब अल हसनसह एकूण ५०० जणांवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. त्यात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याही नावाचा समावेश आहे.
तोपर्यंत शाकीब बांगलादेशकडून खेळत राहील- क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष
हत्या प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर आता बांगलादेशकडून खेळणाऱ्या शकिब अल हसनचे काय होणार हा प्रश्न होता. त्याला खेळण्यास बंदी घातली जाईल की तो खेळत राहणार? याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून याबाबत माहिती देण्यात आली. बांगलादेशचे नवे अध्यक्ष फारुख अहमद यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सध्या तो बांगलादेशकडून खेळत राहिल. अहमद यांच्या म्हणण्यानुसार, शकीबला लवकरात लवकर बांगलादेशला बोलावण्यासाठी त्यांना कायदेशीर नोटीस मिळाली आहे. शाकीब हा वार्षिक करारबद्ध खेळाडू आहे, त्यामुळे त्याला काही कायदेशीर मदत हवी असल्यास तीही दिली जाईल.
भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार की नाही?
सध्या हत्या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. त्यात फक्त एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अजून तपासात बऱ्याच काही गोष्टी घडायच्या आहेत. आरोप निश्चित होईपर्यंत शाकीब खेळत राहणार आहेत असे सांगण्यात आले आहे. पाकिस्ताननंतर बांगलादेशला भारत दौऱ्यावर जायचे आहे. त्या दौऱ्यावरही शाकिब खेळताना दिसेल. आयसीसीच्या नियमांनुसारही, आरोप निश्चित होईपर्यंत शाकिब खेळत राहू शकतो.
Web Title: Shakib Al Hasan arrest postponed in murder case He Will play Test series against Team India said BCB chief
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.