Join us  

Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan ) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 3:36 PM

Open in App

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan ) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मध्यंतरी अम्पायरच्या निर्णयावर त्याने स्टम्प हाताने उखडून संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा असाच काहीसा प्रकार त्याच्याकडून घडलेला दिसतोय. त्याने चाहत्यांशी गैरवर्तन केल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. शाकिबला त्याचा राग अनावर होत नाही, हे अनेकदा पाहायला मिळाले आहे. चाहत्यांव्यतिरिक्त, सहकारी खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांसह त्याच्या गैरवर्तनाचे व्हिडिओ देखील नेहमीच व्हायरल होतात. 

नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका चाहत्यामुळे शाकिब रागावला आहे. चाहत्याने त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा आग्रह धरला पण त्यानंतर शाकिबचा पारा चढला. शाकिबने चाहत्याला वारंवार थांबायला सांगितले आणि तो सेल्फी मागत राहिला. यामुळे संतापलेल्या शाकिबने रागाच्या भरात चाहत्याची मान पकडली. त्यानंतर शाकिबने चाहत्याला धक्का दिला आणि नंतर मारण्यासाठी हात वर केला. तो त्याचा फोनही हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिसला. 

बांगलादेश क्रिकेट संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. पुढील महिन्यापासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० विश्वचषक सुरू होणार आहे आणि त्यासाठी मंडळाने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. वर्ल्ड कपबाबत बोलताना शाकिब म्हणाला की, गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत आम्ही चांगली किंवा वाईट कामगिरी केली नव्हती.  आम्हाला पहिल्या फेरीतील तीन सामने जिंकायचे आहेत. आमची तयारी चांगली आहे.

बांगलादेश संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी ३ सामन्यांची T20 मालिका खेळायची आहे. त्यामुळे परिस्थिती समजून घेण्यात संघाला फायदा होईल. अमेरिकेसोबत खेळल्यास त्यांची स्थिती जाणून घेण्याची संधी मिळेल, असे शाकिब म्हणाला.  

टॅग्स :बांगलादेशऑफ द फिल्ड