नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या आडचणीत वाढ होऊ शकतो. सुत्रांच्या वृत्तानुसार, बीसीसीआयचा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लवकरच मोहम्मद शामीच्या प्रकरणाचा तपास करणार आहे. शामीची बायको पत्नी हसीन जहाँने परदेशातून पैसे आणल्याचा आरोप केला होता.
काल कोलकाता पोलिसांनी हसीनच्या तक्रारीवरून मोहम्मद शमीचा मोबाईल फोन जप्त केला असून त्याच्याकडे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील भटकंतीचा तपशील मागितला आहे. शमीवर आरोप करताना हसीन जहाँने शमीचे इतर मुलींसोबतच्या संभाषणाचे स्क्रिनशॉट आपल्या फेसबुक अकाऊंटवर टाकले होते. त्यामुळे या प्रकरणात शमीच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स आणि अन्य गोष्टींचा तपास करणे गरजेचे असल्याचे कोलकाता पोलिसांनी सांगितले आहे.
हसीनने शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. पण आता तर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
पत्रकारांवर बरसली शामीची पत्नी हसीन
हसीन काल दंडाधिकाऱ्यांपुढे आपली बाजी मांडणार होती. त्यामुळे तिच्याकडून माध्यमांना माहिती हवी होती. हसीन सेंट जोसेफ शाळेमध्ये असल्याचे समजल्यामुळे प्रसारमाध्यमांनी तिथे धाव घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तिला काही प्रश्न विचारले. या प्रश्नांवर ती चांगलीच भडकलेली पाहायला मिळाली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर बोलताना हसीनची भाषा फारशी चांगली नव्हती. प्रतिनिधींवर यावेळी ती चांगलीच बरसली. त्यानंतर तिने एका वाहिनीचा कॅमेरा पकडला आणि जमिनीवर भिरकावून दिला. तिचे हे रुप पाहून साऱ्यांनाच मोठा धक्का बसला. कॅमेरा फोडल्यावर हसीन जास्त काळ तिथे थांबली नाही. त्यानंतर ती थेट आपल्या गाडीत जाऊन बसली आणि तिथून निघून गेली.
महेंद्रसिंग धोनीने केली पाठराखन -
मोहम्मद शामीला पाठिंबा द्यायला आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुढे आला आला. त्याचबरोबर शामीचे सासरे मोहम्मद हसन यांनीही त्याची बाजू घेतली आहे. शामी पैशांसाठी पत्नी आणि देशाला धोका देऊ शकत नाही, असे वक्तव्य धोनीने केले आहे. भारताचा माजी कर्णधार धोनीने यावेळी शामीला पाठिंबा दशर्वला आहे. शामीबाबत धोनी म्हणाला की, " शामी हा एक चांगला व्यक्ती आहे. तो पैशांसाठी पत्नी आणि देशाला धोकाच देऊ शकत नाही. कारण तो एक व्यक्ती आणि खेळाडू म्हणून कसा आहे, हे मी चांगलेच जाणतो. बाकी जे काही आरोप शामीच्या पत्नीने त्याच्यावर केले आहेत त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, कारण ती त्यांची वैयक्तिक बाब आहे. त्याविषयी बोलणे उचित ठरणार नाही. "