कटक : ‘मोहम्मद शमीमुळे अनेकदा मला वेस्ट इंडिजचा महान वेगवान गोलंदाज माल्कम मार्शलची आठवण येते,’ असे मत माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी रविवारी व्यक्त केले. वेस्ट इंडिजच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या मार्शलसोबत तुलना झाल्यामुळे निश्चितच भारताच्या या अनुभवी वेगवान गोलंदाजाचे मनोधैर्य उंचावणार आहे. त्याने या मोसमात वेग, स्विंग व उसळीच्या जोरावर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे.
शमी २०१९ मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ४२ बळींसह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. गावसकर यांना त्यांचा आवडता भारतीय वेगवान गोलंदाज कोण असा प्रश्न केला असता त्यांनी शमीचे नाव घेतले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान समालोचन करताना गावसकर म्हणाले,‘त्याच्यामुळे मला माल्कम मार्शलची आठवण होते. त्याच्याबाबत विचार केला तर मला आताही गाढ झोपेत जाग येते.’
गावसकर यांनी त्याचसोबत भारताच्या वेगवान गोलंदाजीमध्ये क्रांती आणण्याचे श्रेय विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार कपिल देव यांना दिले. शमीच्या कौशल्यामुळे प्रभावित माजी भारतीय कर्णधार गावसकर यांनी यापूर्वी या वेगवान गोलंदाजाची तुलना बिबट्यासोबत केली होती. गावसकर म्हणाले होते,‘तो ज्यावेळी गोलंदाजीसाठी धावत येतो त्यावेळी स्पायडर कॅममधील त्याचे छायाचित्र बघणे शानदार असते. असे वाटते की बिबट्या शिकारीसाठी येत आहे.’
Web Title: Shami's bowling misses Marshall - Gavaskar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.