पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली

पाकिस्तान येथील मुल्तानच्या मैदानात टीम इंडियाच्या जोडीनं सेट केलीये विक्रमी भागीदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 06:41 PM2024-10-07T18:41:56+5:302024-10-07T18:45:18+5:30

whatsapp join usJoin us
Shan Masood Abdulla Shafique Could Not Break Sachin Tendulkar And Virender Sehwag Record Multan Cricket Stadium | पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली

पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंड विरुद्धच्या मुल्तान कसोटी सामन्यात पाकचा कर्णधार शान मसूद आणि अब्दुल्लाह शफिक या जोडीनं विक्रम कामगिरी नोंदवली.  सर्वोच्च भागादीरीसह या जोडीनं खास विक्रमही नोंदवल. यादरम्यान सलामीवीर अब्दुल्लाह शफिक याने १०२ तर शान मसूद याने १५१ धावांची खेळी केली. पण ही जोडी सचिन-सेहवाग जोडीचा विक्रम काही मोडू शकली नाही. 

पाकची जोडी भारी खेळली, पण सचिन-सेहवागसमोर फिकीच ठरली

पाकिस्तानच्या या जोडीनं २५३ धावांच्या दमदार भागीदारीसह खास विक्रमाला गवसणी घातली असली तरी मुल्तानचा सुल्तान विरेंद्र सेहवाग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सेट केलेला रेकॉर्ड मागे टाकायला काही त्यांना जमला नाही. २००४ मध्ये मुल्तान कसोटी सामन्यात  सचिन-सेहवाग जोडीनं ३३६ धावांची भागीदारी रचली होती. या मैदानातील ही सर्वोच्च भागीदारी आहे. दुसऱ्या क्रमांकावर शान मसूद आणि शफिक जोडीचा नंबर लागतो.  या यादीत ब्रायन लारा आणि ड्वेन ब्रावो ही जोडी तिसऱ्या क्रमांकावर आहे. २००६ मध्ये या जोडीनं मुल्तान कसोटी सामन्यात २०० धावांची भागीदारी केली होती.  

पाकिस्तानकडून दुसऱ्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा रेकॉर्ड

  • २९१ धावा- मुश्ताक मोहम्मद आणि झहिर अब्बास विरुद्ध इंग्लंड, १९७१
  • २८७ धावा- अझर अली आणि मोहम्मद हाफिझ विरुद्ध श्रीलंका, २०१२
  • २६२ धावा- इजाझ अहमद आणि सइद अन्वर विरुद्ध न्यूझीलंड, १९९६
  • २५८ धावा- अब्दुल्हाह शफिक आणि शान मसूद विरुद्ध इंग्लंड, २०२४ 

 

मुल्तानच्या मैदानात सुल्तान ठरलीये टीम इंडियाची जोडी

सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या दोघांनी मुल्तान कसोटी सामन्यात ३३६ धावांची भागादारी केली होती. हा कसोटी सामना भारतीय संघाने एक डाव आणि ५२ धावांनी जिंकला होता. सेहवागनं या सामन्यात त्रिशतक झळकवलं होते. दुसरीकडे तेंडुलकर १९४ धावांवर नाबाद राहिला होता. तो द्विशतकाच्या उंबरठ्यावर असताना तत्कालीन कर्णधार राहुल द्रविडन ६७५ धावांवर डाव घोषित केला होता. यावरुन चांगलाच वादही निर्माण झाला होता. 
 

Web Title: Shan Masood Abdulla Shafique Could Not Break Sachin Tendulkar And Virender Sehwag Record Multan Cricket Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.