ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फिरकीपटू शेन वॉर्न याचं वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तो थायलंडमध्ये होता. त्यावेळी त्याच्या विलामध्ये ही घटना घडली. त्याला हार्ट अँटक आल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले, पण त्याने उपचारांना त्याने प्रतिसाद दिला नाही, असं त्याच्या मीडिया टीमने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं. शेन वॉर्नच्या अकाली निधनामुळे क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला. शेन वॉर्नसोबत मैदाना गाजवणारे त्याचे मित्र या वृत्ताने हादरून गेले आहेत. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर असेन, किंवा वेस्टइंडिजचा ब्रायन लारा असेन, दोघांनाही दु:ख अनावर झालं आहे.
क्रिेकेट विश्वात 1990 च्या दशकात सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, शेन वॉर्न, सनथ जयसूर्या यांसारख्या अेक दिग्गज खेळाडूंनी जगभरातील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आपल्या खेळाने आणि खिलाडूवृत्तीने त्यांनी कोट्यवधींची मने जिंकली. काळानुसार पिढी बदलली, क्रिकेटच्या मैदानातून ही नावे मागे पडली, नवी नावे मैदानावर आणि टीव्हीच्या स्क्रीनवर दिसायला लागली. मात्र, या दिग्गज खेळाडूंनी एका दोन पिढ्यांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळेच, ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज शेन वॉर्न ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडल्यास भारतीयांच्या डोळ्यात अश्रू येतात.
शेन वॉर्नच्या निधनानंतर वेस्टइंडिजचा तत्कालीन तडाखेबाज फलंदाज ब्रायन लाराने ट्विट करुन शेन वॉर्नचा फोटो शेअर केला आहे. तसेच, माझा दोस्त गेला... मी निशब्द, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, वॉर्नीच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी असल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.
सचिननेही केलं भावूक ट्विट
शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकर हे दोघे मैदानात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी मैदानाबाहेर खूप चांगले मित्र होते. शेन वॉर्नचं निधन झाल्यानंतर सचिनने एक भावनिक संदेश लिहीला. तीन शब्दांनी त्याने शोकसंदेशाची सुरूवात केली. "धक्कादायक, स्तब्ध करणारी आणि मन सुन्न करणारी (बातमी)… वॉर्नी तुझी आठवण येईल. तू आजूबाजूला असताना मैदानावर किंवा मैदानाबाहेर कधीही कंटाळा आला नाही. तुझा खेळकर स्वभाव खूपच मस्त होता. मैदानावर असताना आपल्यातील झुंज आणि मैदानाबाहेरची आपली मैत्रिपूर्ण भांडणं कायम स्मरणात राहतील. भारतासाठी आणि भारतीयांच्या मनात तुझं नेहमीच एक खास स्थान होतं. तू फार लवकर आमच्यातून निघून गेलास", असं ट्वीट सचिनने केलं.