Join us  

Shane Warne Death: शेन वॉर्नच्या निधनावर थायलंड पोलिसांची महत्त्वाची माहिती; ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या खोलीत होते रक्ताचे डाग

Shane Warne Death: ऑस्ट्रेलियन महान फिरकीपटू शेन वॉर्न याच्या निधनाने क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 10:36 AM

Open in App

Shane Warne Death: ऑस्ट्रेलियन महान फिरकीपटू शेन वॉर्न याच्या निधनाने क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने वॉर्नचे निधन झाले. थायलंड पोलिसांनी शेन वॉर्नच्या निधनाबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. निधन होण्यापूर्वी वॉर्न छातीत दुखत असल्यामुळे डॉक्टरांकडे गेला होता आणि जेव्हा त्याला CPR देण्यात येत होते तेव्हा रक्तस्त्राव झालेला आणि तो खोकतही होता.

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र हेराल्ड सन यांनी थालडंल पोलिसांचा हवाला देताना एक वृत्त प्रसिद्ध केले आहेत. थायलंड पोलीस युत्ताना सिरीसोम्बाट यांनी सांगितले की, निधनापूर्वी तो डॉक्टरांकडे गेला होता. जेव्हा CPR सुरू झाला तेव्हा रक्तस्त्राव होत होता. तसेच वॉनर्ला अस्तमा व हृदयासंबंधित विकाराचा त्रास आधीपासूनच होता. वॉर्नने कोणत्याही प्रकारचे ड्रग्सचे सेवन केलेले नव्हते. रक्तस्त्राव होत असल्याने त्याच्या बिछान्यावर रक्ताचे डाग होते.

‘त्या’ 20 मिनिटांत काय घडले ? शेन वॉर्नच्या चार मित्रांनी केली प्रयत्नांची पराकाष्ठा

शेन वॉर्नचा मृत्यू झाला, त्यावेळी नेमके काय घडले, याची माहिती थायलंडमधील बो पूट येथील पोलीस अधिकारी चॅटचाविन नाकमुसिक यांनी दिली. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,   काही दिवसांपासून शेन वॉर्न थायलंडमधील कोह सामुई येथील व्हिलामध्ये  चार मित्रांसोबत राहत होता.   शुक्रवारी संध्याकाळी शेन वॉर्न जेवणासाठी उठलाच नाही. त्याची चौकशी करण्यासाठी एक मित्र शेन वॉर्नकडे गेला. मात्र, शेन वॉर्न शुद्धीवर नसल्याचे त्याला समजले. त्यानंतर, शेन  शुद्धीत यावा, म्हणून त्याच्यावर सीपीआर करण्यात आला. यामध्ये त्या मित्रांना यश आले नाही.

शेन वॉर्नला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी  मित्रांनी रुग्णवाहिका बोलावली होती. मित्रांनी रुग्णालयाला माहिती दिल्यानंतर कोह सामुई येथील शेन वॉर्नच्या व्हिलावर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम दाखल झाली होती. या टीमनेही वॉर्नला १०-२० मिनिटे सीपीआर दिला. त्यानंतर, थाई आंतरराष्ट्रीय रुग्णालयाची एक रुग्णवाहिका आली. या रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनीही पाच मिनिटांसाठी शेन वॉर्नला सीपीआर दिला. मात्र, हे सर्व प्रयत्न फोल ठरले आणि अखेर शेन वॉर्नचे निधन झाले, अशी माहिती चॅटचाविन या पोलीस अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर ऑस्ट्रेलियाचे विदेशमंत्री मॅरिस पायने यांनी शेन वॉर्नच्या मित्रांसोबत संवाद साधला.  

टॅग्स :शेन वॉर्नथायलंड
Open in App