लंडन : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न हा बऱ्याच गोष्टींमध्ये चर्चेत असतो. कधी ललनांबरोबरचे त्याचे फोटो वायर होतात, तर कधी सिगार ओञताना तो मैदानात पाहिला जातो. आता तर लंडनमध्ये त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. कारण लंडनमध्ये त्याने एक कृत्य केले आहे. या कृत्यामुळे त्याच्यावर लंडनमध्ये एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी एका सट्टेबाजाला माहिती दिल्यामुळे वॉर्नवर दंड ठोठावण्यात आला होता. त्याचबरोबर 2003 साली झालेल्या विश्वचषकाच्या काही दिवसांपूर्वी वॉर्न हा उत्तेजक सेवनचाचणीमध्ये दोषी आढळला होता. त्यामुळे वॉर्नला 2003 साली झालेला विश्वचषक खेळता आला नव्हता. पण आता वॉर्नने नेमकं केलंय तरी काय...
वॉर्न हा पश्चिम लंडनमध्ये राहतो. त्याचबरोबर त्याचे भाड्यावर गाड्याही घेतल्या आहेत आणि त्यामधून तो लंडनमध्ये भटकत असतो. लंडनमध्ये गाडी चालवण्याचे काही नियम आहे. तिथल्या रस्त्यांवर कोणत्या वेगाने गाडी चालवायची, याचेही नियम आहे. त्यानुसार वॉर्नवर ही कारवाई करण्यात आली आहे. वॉर्नने 64 कि.मी. प्रति तासाच्या वेगाने गाडी चालवल्याचे पाहायला मिळाले आहे. दोन वर्षांमध्ये सहा वेळा त्याने हे नियम मोडलेले आहेत. त्यामुळे आता वॉर्नवर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, त्याचबरोबर एका वर्षाची वाहन चालवण्यास बंदीही घालण्यात आली आहे.