Join us  

Shane Warne Last Picture : शेन वॉर्नचा 'तो' अखेरचा फोटो मित्राने सोशल मीडियावर केला पोस्ट; पुन्हा चाहत्यांना अनावर झाले अश्रू

Shane Warne Death – Shane Warne Last Picture: ४ मार्च २०२२मध्ये सायंकाळी अचानक शेन वॉर्नच्या जाण्याचे वृत्त धडकले आणि सारेच स्तब्ध झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 9:25 AM

Open in App

Shane Warne Death – Shane Warne Last Picture: ऑस्ट्रेलियन महान फिरकीपटू शेन वॉर्न याच्या अचानक जाण्याने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला. सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पाँटिंग, मायकेल क्लार्क, ग्लेन मॅकग्रा या समकालीन क्रिकेटपटूंना वॉर्नचे जाणे पचवणे अवघड झाले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पाँटिंग आणि वॉर्न यांची मैत्री घट्ट होती आणि म्हणून  वॉर्नची आठवण निघताच पाँटिंगला अश्रू अनावर झालेले जगाने पाहिले. क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धींसमोर धीटपणे उभा राहणाऱ्या पाँटिंगचे प्रथमच हळवे रुप साऱ्यांनी पाहिले. त्यात आता शेन वॉर्नचा ( Shane Warne) अखेरचा फोटो त्याच्या मित्राने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि तो पाहून चाहत्यांना पुन्हा अश्रू अनावर झाले आहे.

४ मार्च २०२२मध्ये सायंकाळी अचानक शेन वॉर्नच्या जाण्याचे वृत्त धडकले आणि सारेच स्तब्ध झाले. आदल्या दिवशी वॉर्नने आयुष्य हे किती अनिश्चित या बाबतचे ट्विट केले होते. Rod Marsh यांना वॉर्नने श्रद्धांजली वाहिली होती आणि २४ तासांच्या आत वॉर्नचे निधन झाल्याने मोठा धक्का बसला. सुरुवातीला वॉर्नचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज लावला गेला. पण, थायलंड पोलिसांनी सोमवारी शवविच्छेदनाचा अहवाल दिला आणि त्यात वॉर्नचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे म्हटले गेले. वॉर्नचा मृतदेह आता ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, थायलंडमध्ये वॉर्नसोबत असलेल्या त्याच्या मित्राने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. शेन वॉर्नचा क्लिक केलेला तो अखेरचा फोटो ठरेल असा मित्राने स्वप्नातही विचार केला नव्हता. त्या अखेरच्या फोटोतही वॉर्नच्या चेहऱ्यावर तेच नेहमीचे गोड हसू दिसत आहे. थायलंडमध्ये वॉर्न त्याच्या मित्रांसोबत सुट्टीवर गेला होता. त्यावेळी हा फोटो टिपण्यात आला. वॉर्नचा जवळचा मित्रा थॉमस हॉल ( Thomas Hall) याने कोह सामुई येथील हा वॉर्नचा फोटो शेअर केला आहे.

वॉर्नची क्रिकेट कारकीर्द१९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.  

टॅग्स :शेन वॉर्नआॅस्ट्रेलियाथायलंड
Open in App