Join us  

जोस बटलर परिपूर्ण खेळाडू -शेन वॉर्न

पाकविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खराब यष्टीरक्षणामुळे बटलरवर टीका झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 11:32 PM

Open in App

मँचेस्टर : ‘यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलर एक परिपूर्ण खेळाडूप्रमाणे आहे. त्याला इंग्लंडच्या कसोटी संघात नियमित खेळाडू म्हणून जागा मिळायला हवी,’ असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने व्यक्त केले. पाकविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खराब यष्टीरक्षणामुळे बटलरवर टीका झाली.असे असले, तरी याच बटलरने दुसऱ्या डावात प्रतिकूल परिस्थितीमध्ये ७५ धावा काढतानाच ख्रिस वोक्ससह सहाव्या गड्यासाठी १३९ धावांची निर्णायक भागीदारीही केली. यामुळे इंग्लंडचा विजय सुकर झाला. वॉर्नने त्याच्याविषयी मत व्यक्त करताना सांगितले की, ‘संघात त्याला नियमित स्थान मिळायला हवे. जोस चांगला आणि भरवशाचा यष्टीरक्षक आहे. कधी कधी नक्कीच एखाद्याचा दिवस खराब जातो.शिवाय पहिल्या कसोटीतील परिस्थितीही सोपी नव्हती. त्याला आपल्या क्षमतेमुळे विशेष म्हणजे फलंदाजीमुळे संघात कायम स्थान मिळायला हवे. तो शांत राहतो आणि त्याच्यात संघाचे नेतृत्व करण्याचे गुणही आहेत. तो एक परिपूर्ण खेळाडूप्रमाणे आहे.’ (वृत्तसंस्था)