Shane Warne, Shocking Revelations: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचं वयाच्या ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तो थायलंडमध्ये होता. त्यावेळी त्याच्या विलामध्ये ही घटना घडली. त्याच्या वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या उपचारांना त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याला मृत घोषित करण्यात आलं. शेन वॉर्नच्या अकाली निधनामुळे काही प्रश्न निर्माण झाले होते. पण थायलंड पोलिसांनी, शेन वॉर्नचे निधन हे नैसर्गिक असल्याचं स्पष्ट केलं. याचदरम्यान शेन वॉर्न याची काऊन्सिलर असलेल्या Lianne Young यांनी काही धक्कादायक खुलासे केले.
द सनच्या वृत्तानुसार, लियान यंग या २०१५ पासून शेन वॉर्नचं रिलेशनशिप काऊन्सिलिंग (नातेसंबंध) व इतर संबंधांतील सल्लागार होत्या. शेन वॉर्नच्या कॉऊन्सिलर लियान यंग म्हणाल्या की शेन वॉर्न काही दिवसांपासून खूप आनंदी होता. त्याला वाटायचं की त्याच्याकडे अजून किमान ३० वर्षांचं आयुष्य आहे. लियानच्या यांच्या मते, शेन वॉर्न भविष्यासाठी खूप तयारी करत होता. मुलांसोबत थोडा वेळ घालवता यावा म्हणून त्याने तीन महिने सुट्टी घेतली होती. त्याला तब्येतीची फारशी काळजी वाटत नव्हती कारण तो अजून तीस वर्ष सहज जगू शकतो असं त्याला वाटत होतं.
लियान यांनी दिलेल्या माहितीत एक धक्कादायक गोष्ट उघड झाली. शेन वॉर्नसोबत लियान यांची जी सेशन्स होत असत त्या सत्राबाबत लियान यंग यांनी सांगितले की, जेव्हा मी त्याला अनेक प्रश्न विचारले तेव्हा तो आनंदी होता. पण तो शेन वॉर्न हा 'फॅट शेमिंग फोटों'बद्दल (hurt by fat-shaming pictures) खूप निराश झाला होता. त्याला त्याच्या जाडेपणाबाबत लाज वाटायची आणि म्हणूनच तो त्यानंतरच अचानक १४ दिवस फक्त ज्यूस डाएटवर राहिला होता. तो सतत फिटनेसवर लक्ष केंद्रित करत राहिला.
शेन वॉर्नने इन्स्टाग्रामवर त्याच्या मृत्यूच्या चार दिवस आधी जी शेवटची पोस्ट टाकली होती. त्यातही त्याने जुलै महिन्यापर्यंत पुन्हा बारीक होणार असल्याचं लिहीलं होतं. त्यामुळे त्याला आपण जाड असल्याचा न्यूनगंड सतावू लागला असल्याची चर्चा चाहत्यांमध्येही होती. तशातच त्यांच्या काऊन्सिरलने ही बाब उघड केली.
Web Title: Shane Warne relationship counsellor Lianne Young shocking revelations hurt by fat shaming pictures but wanted to live more 30 years
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.