बँकॉक – ऑस्ट्रेलियातील फिरकी गोलंदाज आणि जगविख्यात क्रिकेटर शेन वॉर्नच्या निधनानं क्रिकेट रसिकांना मोठा धक्का बसला. थायलँडमध्ये ५२ वर्षीय शेन वॉर्नचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. या बातमीची पुष्टी त्याच्या मॅनजमेंटनं दिली. आता या प्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. शेन वॉर्नसोबत थायलँडच्या एका खासगी व्हिलावर त्याचे ३ मित्रही उपस्थित होते.
घटनेच्या वेळी शेन वॉर्नच्या(Shane Warne) जवळील मित्रांनी २० मिनिटं त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आलं नाही. ही माहिती थायलँड पोलिसांना देण्यात आली आहे. परंतु आतापर्यंत शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत काही संशयास्पद आढळलं नाही असं पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शेन वॉर्न आणि त्याचे ३ मित्र प्रायव्हेट व्हिलावर थांबले होते. त्यावेळी रात्रीच्या जेवणास वॉर्न रुममधून खाली आला म्हणून एक मित्र त्याला बोलावण्यासाठी रूमवर गेला. तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्यानंतर सगळे धावत रुममध्ये आले. त्यातील एकाने CPR देत वॉर्नचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि एकाने तातडीनं रुग्णवाहिकेला फोन केला.
शेन वॉर्नला आपत्कालीन स्थितीत थाईच्या आंतरराष्ट्रीय रुग्णालयात आणलं गेले. त्याठिकाणी ५ मिनिटं CPR देण्यात आला. परंतु वॉर्नचा जीव वाचला नाही. डॉक्टरांनी मृत्यूचं कारण सांगितले नसले तरीही संशयास्पद असल्याचं मान्य केले नाही. ऑस्ट्रेलियातील परराष्ट्र मंत्री मारिस पायने यांनी शेन वॉर्नसोबत असलेल्या मित्रांशी संवाद साधला आहे. शेन वॉर्नचा मृतदेह ऑस्ट्रेलियात नेला जाणार आहे. तसेच थाई प्रशासनाशी ऑस्ट्रेलिया संपर्कात आहे. या प्रकरणी सर्व मदत करण्याचं आश्वासन थायलँडनं दिलं आहे. लवकरच वॉर्नचा मृतदेह ऑस्ट्रेलियाला पाठवला जाईल.
सीपीआर(CPR) म्हणजे काय?
कार्डियो पल्सनरी रेसॅसिटेशन(Cardiopulmonary Resucitation) म्हणजे सीपीआर. आपत्कालीन परिस्थितीत तातडीचा उपचार म्हणून CPR चा वापर केला जातो. हार्ट अटॅक आलेल्या एखाद्या व्यक्तीला किंवा श्वास कोंडलेल्या स्थितीत असलेल्या व्यक्तीचा जीव CPR मुळे वाचू शकतो. सीपीआर देण्यासाठी कुठल्याही वैद्यकीय साहित्याची गरज भासत नाही. ज्या व्यक्तीचा श्वास गेला आहे. त्याच्या छातीवर दाब दिला जातो. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सामान्य होण्यास मदत मिळते. सीपीआरमध्ये रुग्णाला तोंडानेही श्वास दिला जातो.