बँकॉक : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्याची माहिती सोमवारी थायलंड पोलिसांनी दिली. हा अहवाल वॉर्नचे कुटुंबीय आणि ऑस्ट्रेलियाच्या दूतावासाला पाठविण्यात आल्याची माहिती थायलंड पोलिसांचे प्रवक्ते किसाना पाथनाचारोन यांनी दिली. वॉर्नचे पार्थिव ऑस्ट्रेलियाकडे कधी रवाना केले जाईल, याची मात्र माहिती मिळू शकली नाही.
वॉर्नच्या कुटुंबीयांनीदेखील मृत्यूबाबत घातपाताची शक्यता व्यक्त केली नव्हती. प्राथमिक तपासात वॉर्नला हदयविकाराचा झटका आल्याचे म्हटले होते. वॉर्नचे वडील कीथ आणि आई ब्रिजिट यांनी लिहिले, ‘शेनविना भविष्याची कल्पना करता येणार नाही. त्याच्यासोबत घालविलेल्या सुखद आठवणीच आम्हाला या पर्वतासारख्या दु:खातून सावरू शकतील. आमच्या कुटुंबीयांनी वॉर्नच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची सूचना मान्य केली आहे. शेनला व्हिक्टोरियन्स आणि ऑस्ट्रेलियन्स होण्याचा किती गर्व वाटायचा याची सर्वांना जाणीव आहे.’
वाॅर्नने दोन आठवड्यांआधी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती, केवळ लिक्विड डायट घ्यायचा सिडनी : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी निधन झाले. वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नांनंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्याचा व्यवस्थापक जेम्स एर्सकिने याने सुटीवर जाण्याआधी वॉर्नने दोन आठवड्यांपूर्वीच छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. तो केवळ ‘लिक्विड डायट’ घ्यायचा, असा खुलासा केला आहे.n एर्सकिने याने ‘नाईन नेटवर्क’शी बोलताना सांगितले की, वॉर्नचा आहार वेगळाच होता. १४ दिवस आधीपासून तर तो केवळ लिक्विड डायटवरच होता. असे त्याने आधीही तीन-चार वेळा केले होते. तो काळ्या आणि हिरव्या रंगाच्या फळांचा रस, पांढरे बनमस्का किंवा लसूण बनमस्का खात होता. आयुष्यभर वॉर्न सिगारेट पीत राहिला. माझ्या मते, वॉर्नला हृदयाचा झटकाच आला असावा.’ दरम्यान, थायलंड पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात वॉर्नच्या मृत्यूमागे कुठलाही घातपात नसल्याचे म्हटले आहे. वॉर्नच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. n मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी वॉर्नने इन्स्टाग्रामवर जुना फोटो पोस्ट करीत तो वजन कमी करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले होते. ‘ऑपरेशन वजन कमी करणे, लक्ष्य जुलैपर्यंत...’ असे लिहिले होते. वॉर्नच्या कुटुंबीयांनी देखील थायलंड पोलिसांना दिलेल्या माहितीत वॉर्नला हृदयविकाराचा त्रास असल्याचे म्हटले होते. वॉर्नच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, वाॅर्नचे अखेरचे भोजन ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध व्हेजेमाईट (फूड स्प्रेड) टोस्ट होते. n ‘द स्पोर्टिंग न्यूज’चे सीईओ टॉम हाॅल यांनी पोर्टलवर लिहिले, ‘मी अनेकदा वॉर्नसोबत जेवलो; पण त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध व्हेजेमाईट टोस्ट घेतले. तो पूर्णपणे ऑस्ट्रेलियन होता. जेवल्यानंतर मुलांशी फोनवर संवाद साधला आणि बेडरूममध्ये निघून गेला होता.’
अंत्यसंस्काराला एक लाख लोकांची उपस्थिती?मेलबोर्न : एमसीजीवर पुढच्या दोन किंवा तीन आठवड्यात शेन वॉर्नचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होईल. यावेळी एक लाख लोकांची गर्दी उसळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर सार्वजनिक शोकसभा होणार आहे. त्याआधी वॉर्नचे पार्थिव थायलंडमधून येथे आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. व्हिक्टोरियाचे पंतप्रधान डॅनियल ॲन्ड्र्यूज हे वॉर्नच्या कुटुंबीयांसोबत चर्चा करीत असून, वॉर्नच्या अंत्यसंस्कारासाठी एमसीजी हेच योग्य स्थळ असेल, असे अनेकांना वाटते. या मैदानाबाहेर वॉर्नचा पुतळादेखील आहे. वॉर्नने बॉक्सिंंग डे कसोटीत इंग्लंडविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती.