बाबा, तुला घट्ट मिठी मारू शकले असते...!; Shane Warneच्या मुलांचं भावनिक पत्र, लेक Summer Warne ची पोस्ट चर्चेत!

ऑस्ट्रेलियन महान फिरकीपटू शेन वॉर्न ( Shane Warne) याच्यासाठी मुलांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. ४ मार्चला थायलंड येथे वॉर्नचे निधन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 11:48 AM2022-03-08T11:48:48+5:302022-03-08T11:49:09+5:30

whatsapp join usJoin us
Shane Warne's daughter Summer Warne posts heartwarming tribute for her father, Warne's children share emotional tributes   | बाबा, तुला घट्ट मिठी मारू शकले असते...!; Shane Warneच्या मुलांचं भावनिक पत्र, लेक Summer Warne ची पोस्ट चर्चेत!

बाबा, तुला घट्ट मिठी मारू शकले असते...!; Shane Warneच्या मुलांचं भावनिक पत्र, लेक Summer Warne ची पोस्ट चर्चेत!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियन महान फिरकीपटू शेन वॉर्न ( Shane Warne) याच्यासाठी मुलांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. ४ मार्चला थायलंड येथे वॉर्नचे निधन झाले. शवविच्छेदनाच्या अहवालात त्याचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचे समोर आले. सुरुवातीला त्याचा मृत्य हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. वॉर्नच्या निधनानंतर त्याच्या मुलांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. वॉर्नची मुलगी समर  (  Summer Warne ) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जुने फोटो व व्हिडीओ शेअर केले. समर ही शेन वॉर्नची मोठी मुलगी आहे.

''बाबा, मला तुझी खूप आठवण येतेय..  माझी इच्छा आहे की मी तुला आणखी घट्ट मिठी मारली असती जे मला माहित नव्हते की तुझ्याबरोबरचे माझे शेवटचे क्षण होते.  माझी इच्छा आहे की मी तुला सांगू शकले असते की सर्व काही ठीक होणार आहे आणि तुझा हात धरा धरला असता. तू सर्वोत्तम बाबा आहेस,” असे समरने लिहिले. 

ब्रूक व जॅक्सन यांनीही वडिलांना श्रद्धांजला वाहिली. समरने पुढे लिहिले की,'' एकमेकांसोबतच्या हसत आणि मस्करी करण्याच्या आपल्या शेवटच्या आठवणी मी कायम जपेन. आम्ही आनंदी होतो. आपण बर्‍याच प्रकारे सारखेच होतो आणि मी नेहमी विनोद करायचे की, आमच्यात तुझे जीन्स ( आनुवंशिकतावाहक) आहेत.'' 


वॉर्नचा २३ वर्षीय मुलगा जॅक्सन यानेही भावनिक पोस्ट शेअर केली. ''माझा भाऊ, माझा सर्वात चांगला मित्र, माझ्या वडिलांसाठी, I Love You so much!, तुझ्या जाण्याने माझ्या मनात निर्माण झालेली पोकळी कुणीच भरून काढू शकत नाही. पोकर टेबलवर बसणे, गोल्फ कोर्सवर फिरणे आणि पिझ्झा खाणे हे आता पुन्हा होणार नाही. पण मला माहित आहे की, परिस्थिती काही असो मी नेहमी आनंदी राहावं ही तुझी इच्छा आहे.''  

वॉर्नची क्रिकेट कारकीर्द
१९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता. 
 

Web Title: Shane Warne's daughter Summer Warne posts heartwarming tribute for her father, Warne's children share emotional tributes  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.