Join us  

शेन वॉर्नचा मृत्यू कोरोना लसीमुळे?, सव्वा वर्षानंतर डॉक्टरांचा दावा

वॉर्नच्या आकस्मिक मृत्यूमुळे जगभरात  चर्चा झाली होती. वॉर्नचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला होता, असे अहवालात सांगण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 6:51 AM

Open in App

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा महान माजी फिरकीपटू शेन वॉर्न याचे मार्च २०२२ला थायलंडमध्ये निधन झाले होते. मात्र, त्याच्या निधनाची चर्चा आजही होते. शेन वॉर्न थायलंडमध्ये सुटीचा आनंद घेण्यासाठी गेला होता. तो एका व्हिलाच्या रूममध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. वॉर्नच्या आकस्मिक मृत्यूमुळे जगभरात  चर्चा झाली होती. वॉर्नचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला होता, असे अहवालात सांगण्यात आले होते.

 आता शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात शेन वॉर्नचा मृत्यू  कोरोना लसीमुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. डॉक्टरांनी दावा केला की, वॉर्नच्या मृत्यूचे कारण हे कोरोना लस असू शकते.  शेन वॉर्नने मृत्यूपूर्वी ९ महिने आधी कोरोना लस घेतली होती. ही लस कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आली होती. या लसीमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. शेन वॉर्नचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता. 

शेन वॉर्नने एमआरएनए ही लस घेतली होती. अहवालानुसार, या लसीमुळे हृदयासंबंधीच्या विकारात वाढ होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया  आणि ब्रिटिश हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा मृत्यूदेखील याच कारणामुळे झाला आहे. याशिवाय कार्डियोलॉजिस्ट क्रिस नील आणि डॉक्टर असीम मल्होत्रा यांच्या मते, वॉर्नने जी लस घेतली होती, त्या लसीमुळे हृदयाच्या धमन्यांचा रोग वेगाने वाढू शकतो. शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून १४५ कसोटी आणि १९४  वनडे सामने खेळले होते. त्याने कसोटीत ७०८ तर वनडेमध्ये २९३ गडी बाद केले होते. याशिवाय आयपीएलमध्येदेखील त्याने ५५ सामन्यांत ५७ विकेट्स घेतल्या होत्या.

टॅग्स :शेन वॉर्न
Open in App