Join us  

Shane Warne Death : शेन वॉर्नच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट, मृत्यूचं खरं कारण आलं समोर; थायलंड पोलिसांकडून महत्त्वाचे अपडेट्स

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न ( Shane Warne Autopsy Report) शवविच्छेदनाचा रिपोर्ट समोर आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 1:41 PM

Open in App

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न ( Shane Warne Autopsy Report) शवविच्छेदनाचा रिपोर्ट समोर आला असून त्यात नैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. थायलंड पोलिसांनी शवविच्छेदनाच्या निकालांचा हवाला देत म्हटले आहे. वॉर्नच्या कुटुंबीयांना निकालाची माहिती देण्यात आली आहे आणि त्यांनी हा रिपोर्ट स्वीकारला आहे. आता वॉर्नचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे परतण्यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केला जाईल, असे उपराष्ट्रीय पोलिस प्रवक्ता किसाना फथनाचारोन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता. 

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र हेराल्ड सन यांनी थायलंड पोलिसांचा हवाला देताना एक वृत्त प्रसिद्ध केले आहेत. थायलंड पोलीस युत्ताना सिरीसोम्बाट यांनी सांगितले की, निधनापूर्वी तो डॉक्टरांकडे गेला होता. जेव्हा CPR सुरू झाला तेव्हा रक्तस्त्राव होत होता. तसेच वॉनर्ला अस्तमा व हृदयासंबंधित विकाराचा त्रास आधीपासूनच होता. वॉर्नने कोणत्याही प्रकारचे ड्रग्सचे सेवन केलेले नव्हते. रक्तस्त्राव होत असल्याने त्याच्या बिछान्यावर रक्ताचे डाग होते.

टॅग्स :शेन वॉर्नथायलंड
Open in App