चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर शेन वॉटसनने शनिवारी बिग बॅश लीगमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. 2016 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणाऱ्या वॉटसनने बिग बॅश लीगमधील सिडनी थंडर्स संघाशी चार वर्षांपूर्वी करार केला होता. आजच्या निर्णयानंतर ऑस्ट्रेलियातील त्याची व्यावसायिक क्रिकेट कारकीर्द संपुष्टात येणार आहे. 37 वर्षीय वॉटसनने गतवर्षी सिडनी थंडर्स संघाचे नेतृत्व सांभाळले होते. बिग बॅश लीगमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर वॉटसन आयपीएलमधूनही निवृत्ती स्वीकारणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच हे त्याचे आयपीएलमधील अखेरचे वर्ष असल्याचेही बोलले जात आहे.
वॉटसनने सांगितले की,''सिडनी थंडर्सच्या सहकाऱ्यांचे मी आभार मानू इच्छितो. या संघासोबतचा चार वर्षांचा प्रवास अविस्मरणीय होता आणि या आठवणी नेहमी सोबत राहतील.''
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी केव्हिन रॉबर्ट्सने वॉटसनला शूभेच्छा दिल्या. ते म्हणाले,''मर्यादित षटकांच्या या फॉरमॅटमध्ये वॉटसनची फटकेबाजी पाहण्याचा आनंद मिळत राहिला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट आणि बिग बॅश लीगमध्ये त्याचे भरपूर योगदान आहे.''
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या या खेळाडूने या मोसमात 11 सामन्यांत 243 धावा केल्या आहेत. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 96 धावांची वादळी खेळी केली होती. सिडनी थंडर्सकडून वॉटसनने 42 सामन्यांत 1058 धावा केल्या आहेत. शिवाय त्याने 20 विकेट्सही घेतल्या आहेत.
Web Title: Shane Watson ends Australian career with BBL retirement, this could be his last IPL?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.