England vs West Indies 1st Test : शेनॉन गॅब्रीयलची दमदार कामगिरी; अनिल कुंबळेच्या आगळ्या वेगळ्या विक्रमाशी बरोबरी

England vs West Indies, 1st Test: सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात विंडीज गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 05:22 PM2020-07-09T17:22:32+5:302020-07-09T17:23:03+5:30

whatsapp join usJoin us
Shannon Gabriel equalize Anil Kumble record; become a fifth bowler who tak Top-3 batsmen in the first innings without fielder's help | England vs West Indies 1st Test : शेनॉन गॅब्रीयलची दमदार कामगिरी; अनिल कुंबळेच्या आगळ्या वेगळ्या विक्रमाशी बरोबरी

England vs West Indies 1st Test : शेनॉन गॅब्रीयलची दमदार कामगिरी; अनिल कुंबळेच्या आगळ्या वेगळ्या विक्रमाशी बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बुधवारपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा झाला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कालपासून सुरू झाला. पावसानं पहिल्या दिवसाच्या खेळावर पाणी फिरवले असले तरी क्रिकेटच्या पुनरागमनानं सर्व सुखावले आहेत. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात विंडीज गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. शेनॉन गॅब्रीयलनं त्रिफळा उडवून इंग्लंडच्या फलंदाजांना माघारी पाठवले. या कामगिरीसह त्यानं भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याच्या विक्रमाशी बरोबरी केली. 

इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ 17.4 षटकांचा खेळ झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्ली ( 0) याला खातेही खोलू न देता शेनॉन गॅब्रीयल यानं त्रिफळाचीत करून माघारी पाठवले. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना थांबवण्यात आला आणि इंग्लंडने पहिल्या दिवशी 1 बाद 35 धावा केल्या. रोरी बर्न्स ( 20) आणि जो डेन्ली ( 14) नाबाद होते.

दुसऱ्या दिवशी बर्न्सनं नावावर विक्रम नोंदवला. 16वा कसोटी सामना खेळणाऱ्या बर्न्सनं 1000 धावांचा पल्ला पार केला. 2007नंतर बर्न्स हा 1000 धावांचा पल्ला पार करणारा पहिलाच इंग्लिश सलामीवीर ठरला. 2007मध्ये अॅलेस्टर कुकनं हा विक्रम केला होता. आतापर्यंत इंग्लंडच्या 28 सलामीवीरांनी 1000 हून अधिक धावा केल्या आहेत आणि त्यात बर्न्सच्या नावाचाही समावेश झाला आहे. सलामीवीर म्हणून इंग्लंडकडून सर्वाधिक धावांचा विक्रम कूकच्या नावावर आहे. त्यानं 11845 धावा केल्या आहेत.  

पण, त्यानंतर विंडीजच्या गोलंदाजांनी यजमानांना धक्का देण्याचे सत्र कायम राखले. गॅब्रीयलनं डेन्लीचा ( 18) त्रिफळा उडवला आणि त्यानंतर कर्णधार जेसन होल्डरनं इंग्लंडच्या झॅक क्रॅवली ( 10) याला पायचीत केले. मागील तीन वर्षांत विंडीजकडून सर्वाधिक 27 वेळा प्रतिस्पर्धी फलंदाजांना त्रिफळाचीत करण्याचा विक्रम गॅब्रीयलनं नावावर केला. 


याशिवाय कसोटी क्रिकेटच्या पहिल्या डावात आघाडीच्या तीन फलंदाजांना सहकारी खेळाडूच्या मदतीशिवाय बाद करणारा तो पाचवा गोलंदाज बनला आहे. गॅब्रीयलनं आज घेतलेल्या तीन विकेट्सपैकी दोन त्रिफळाचीत आणि एक पायचीत आहे. 

अशी कामिगीर करणारे पाच गोलंदाज

  • इयान पिल्बेस ( इंग्लंड) वि. न्यूझीलंड, 1931
  • अॅलेक बेडसर ( इंग्लंड) वि. ऑस्ट्रेलिया, 1953
  • अनिल कुंबळे ( भारत) वि. दक्षिण आफ्रिक, 2004
  • चनका वेलेगेदरा ( श्रीलंका) वि. भारत, 2009
  • शेनॉन गॅब्रीयल ( वेस्ट इंडिज) वि. इंग्लंड, 2020

अन्य महत्त्वाच्या बातम्या

आयपीएल 2020 च्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवलेला नाही; या देशानं फेटाळलं वृत्त

शाहिद आफ्रिदीची मोठी घोषणा; इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाला देणार 'सहारा'!

बीसीसीआयचा पाकिस्तानला धोबीपछाड; श्रीलंकेच्या खांद्यावर  बंदूक ठेवून केली शिकार!

वेस्ट इंडिजच्या कर्णधाराकडून झाली चूक; विसरला महत्त्वाचा नियम 

सौरव गांगुलीच्या विधानाला किंमत नाही, दर आठवड्याला अशी चर्चा उठवली जाते; पीसीबीची टीका

Video : आकाश चोप्राच्या पत्नीनं दिली घर सोडून जाण्याची धमकी, जाणून घ्या कारण!

 13 वर्षानंतर इंग्लंडच्या सलामीवीरानं केला पराक्रम; त्या 28 जणांमध्ये मानाचं स्थान

हरणाच्या शिकारीसाठी सिंह सज्ज; 'या' फोटोत शोधून दाखवा बरं! 

माकडालाही कोरोनाची धास्ती; मास्क घातलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Web Title: Shannon Gabriel equalize Anil Kumble record; become a fifth bowler who tak Top-3 batsmen in the first innings without fielder's help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.