Join us  

शार्दुल बनला वाँडरर्सवर ७ बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज!

दुसरी कसोटी : दक्षिण आफ्रिकेची भारतावर निसटती आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 5:23 AM

Open in App

जोहान्सबर्ग : वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या ७ बळींमुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात २२९ धावांवर रोखणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात अडखळत सुरुवात करीत दोन्ही सलामीवीर गामावले. कर्णधार लोकेश राहुल(८)आणि मयंक अग्रवाल(२३) हे लवकर बाद होताच २ बाद ८५ अशी स्थिती झाली. खेळ थांबला त्यावेळी भारताकडे ५८ धावांची आघाडी झाली होती. चेतेश्वर पुजारा ३५ आणि अजिंक्य रहाणे ११ धावांवर नाबाद आहेत.

मोहम्मद शमीने दोन आणि जसप्रीत बुमराहने एक गडी बाद केला.द.आफ्रिकेचा दुसरा फलंदाज ८८ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर त्यांनी १०२ धावांपर्यंत चार फलंदाज गमावले. दुसऱ्या दिवशी तिनही बळी शार्दुलने घेतले. त्याने एल्गर २८, पीटरसन ६२, रासी वॉन दुसेन १ यांना बाद केले.त्याआधी बुमराहच्या चेंडूवर एल्गरचा झेल पंतने टिपला होता. सॉफ्ट सिग्नलनुसार त्याला बाद ठरविण्यात आले, मात्र रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागला नसल्याचे दिसले. त्यामुळे त्याला जीवदान मिळाले. तथापि, तो १२० चेंडूत केवळ २८ धावा काढून बाद झाला. उपाहारानंतर यजमान संघाने ८९ धावांची भर घालून आणखी तीन फलंदाज गमावले. शार्दुलने काइल वेरेन्नेला पायचित केले. त्यानंतर तेम्बा बावुमालादेखील पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. कॅगिसो रबाडा खाते उघडण्याआधीच शमीच्या चेंडूवर सिराजकडे झेल देत परतला.चहापानानंतर केशव महाराज आणि मार्को जेन्सन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शार्दुलने जेन्सन आणि लुंगी एनगिडी यांना तर केशव महाराजला बुमराहने बाद केले.

दुसेनच्या झेलबाबत एल्गरने घेतली सामनाधिकाऱ्यांची भेटजोहान्सबर्ग : द. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याने दुसऱ्या दिवशी उपाहारादरम्यान सामनाधिकाऱ्यांशी भेटून रासी वॉन डेर दुसेन याचा यष्टिरक्षक ऋषभ पंत याने टिपलेल्या शंकास्पद झेलबाबत चर्चा केली. मैदानी पंच इरॅसमस आणि अलाउद्दीन पालेकर, तिसरे पंच एड्रियन होल्डस्टॉक आणि मॅच रेफ्री ॲन्डी पायक्रॉफ्ट यांच्याशी एल्गरचे काय बोलणे झाले, याबाबत कळू शकले नाही. मैदानी पंचांनी उपाहाराआधी शार्दुलच्या चेंडूवर रासी वॉन दुसेनला यष्टीमागे झेलबाद दिले होते. ऋषभने टिपलेला हा झेल शंकास्पद वाटत होता. चेंडू ग्लोव्हजमध्ये स्थिरावण्याआधी जमिनीला लागला का, हे स्पष्ट दिसत नव्हते. नियम १.२ नुसार मैदानी पंचांचा निर्णय बदलण्यासाठी स्पष्ट पुरावा हवा असतो. पुरावा ताबडतोब दिल्यास तिसरे पंच निर्णय बदलू शकतात, अन्यथा मैदानी पंचांचा निर्णय अंतिम गणला जातो.n शार्दुल या मैदानावर एका डावात सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने अनिल कुंबळे ६/५३ यांचा विक्रम मोडीत काढला. 

n शार्दुल कसोटी कारकिर्दीतही पहिल्यांदा वाँडरर्सवर  पाचहून अधिक गडी बाद करणारा भारताचा सहावा गोलंदाज बनला. त्याआधी मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, एस. श्रीसंत, जवागल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे यांनी अशी कामगिरी केली. 

n द.आफ्रिकेकडून किगन पीटरसन (५१) याने कसोटीत पहिले शतक ठोकले. याआधी पीटरसनची सर्वोच्च कसोटी खेळी १९ धावांची होती.

भारत पहिला डाव : सर्वबाद २०२, द. आफ्रिका पहिला डाव : डीन एल्गर झे. पंत गो. शार्दुल २८, एडेन मार्कराम पायचित गो. शमी ७, किगन पीटरसन झे. अग्रवाल गो. शार्दुल ६२, रासी वॉन दुसेन झे. पंत गो. शार्दुल १, तेम्बा बावुमा झे. पंत गो. शार्दुल २१, काइल वेरेन्ने पायचित गो. शार्दुल २१, मार्को जेन्सन झे. आणि गो. शार्दुल २१,  कॅगिसो रबाडा झे. सिराज गो. शमी ००, केशव महाराज त्रि. गो. बुमराह २१, डेन ऑलिव्हर नाबाद १, लुंगी एनगिडी झे. पंत गो. शार्दुल ०० अवांतर: १६, एकूण: ७९.४ षटकात सर्वबाद २२९. बाद क्रम: १-१४,२-८८,३-१०१,४-१०२,५-१६२,६-१७७,७-१७९,८-२१७,९-२२८,१०-२२९.गोलंदाजी : जसप्रीत बुमराह २१-५-४९-१, मोहम्मद शमी २१-५-५२-२, मोहम्मद सिराज ९.५-२-२४-०, शार्दुल ठाकूर १७.५-३-६१-७, अश्विन  १०-१-३५-०.भारत दुसरा डाव: लोकेश राहुल झे. मार्कराम गो जेन्सन ८, मयंक अग्रवाल पायचित गो. ऑलिव्हर २३, तेतेश्वर पुजारा नाबाद ३५, अजिंक्य रहाणे नाबाद ११ अवांतर: ८, एकूण: २० षटकात २ बाद ८५ धावा. बाद क्रम: १-२४,२-४४. गोलंदाजी: रबाडा ६--१-२६-०, ऑलिव्हर ४-०-२२-१, एनगिडी ३-१-५-०, जेन्सन ६-२-१८-१, केशव महाराज १-०-८-०. 

टॅग्स :शार्दुल ठाकूर
Open in App