WTC Final 2021: रिषभ पंतनं केली रवी शास्त्री यांच्याकडे शार्दूल ठाकूरची तक्रार, Video मध्ये कैद झाला सारा प्रकार!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी भारतीय संघानं दोन गट पाडून सरावाला सुरूवात केली. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 02:44 PM2021-06-14T14:44:18+5:302021-06-14T14:44:45+5:30

whatsapp join usJoin us
'Shardul nets par chala gaya seedha': Rishabh Pant tells Ravi Shastri after intra-squad match, Video | WTC Final 2021: रिषभ पंतनं केली रवी शास्त्री यांच्याकडे शार्दूल ठाकूरची तक्रार, Video मध्ये कैद झाला सारा प्रकार!

WTC Final 2021: रिषभ पंतनं केली रवी शास्त्री यांच्याकडे शार्दूल ठाकूरची तक्रार, Video मध्ये कैद झाला सारा प्रकार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी भारतीय संघानं दोन गट पाडून सरावाला सुरूवात केली. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. सराव सामन्यात रिषभ पंत, रोहित शर्मा, शुबमन गिल, लोकेश राहुल यांनी दमदार फटकेबाजी केली, तर इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांनी विकेट्स घेतल्या. सरावाच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतरही शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) सहकाऱ्यांसोबत पॅव्हेलियनमध्ये न परतता नेट्समध्ये फलंदाजी करायला पुन्हा गेला अन् रिषभ पंतनं ( Rishabh Pant) लगेच ही गोष्ट मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांच्या कानावर टाकली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताच्या गोलंदाजांनी फलंदाजीत योगदान दिलं होतं. वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन व शार्दूल ठाकूर यांनी त्यांची अष्टपैलू ताकद दाखवली होती. त्यामुळेच शार्दूल इंग्लंड दौऱ्यावरही फलंदाजीत कमाल दाखवण्यासाठी मेहनत घेत आहे. सराव सामना संपल्यानंतर शार्दूल नेट्समध्ये फलंदाजीच्या सरावासाठी गेला. तेव्हा सीमारेषेनजीक उभ्या असलेल्या रिषभनं स्टेडियमच्या बालकनित उभ्या असलेल्या शास्त्रींना हे सांगितले.

  • रिषभ पंत - सर!
  • रवी शास्त्री - काय झालं?
  • रिषभ पंत - शार्दूल !
  • रवी शास्त्री - तो, तिकडे गेला आहे?
  • रिषभ पंत - नेट्समध्ये थेट गेला आहे. 

 

पाहा व्हिडीओ.. 


न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शार्दूल ठाकूरची निवड होणे अशक्य आहे. या सराव सामन्यात रवींद्र जडेजानं 76 चेंडूंत 54 धावा केल्या. रिषभनं 94 चेंडूंत 121 धावा, गिलनं 85 धावा, लोकेश राहुलनंही शतक झळकावलं, तर रोहितनंही 80+ धावा केल्या. 
 

 

 

Web Title: 'Shardul nets par chala gaya seedha': Rishabh Pant tells Ravi Shastri after intra-squad match, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.