Shardul Thakur engagement: भारतीय संघाचा गोलंदाज शार्दूल ठाकूर याचा आज सारखपुडा पार पडला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर शार्दूल ठाकूर विश्रांतीवर आहे आणि तो डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणं अपेक्षित आहे. शार्दूल त्याची प्रेयसी मित्ताली परुळकर ( Mittali Parulkar) हिच्यासोबत साखरपुडा केला. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत. ३० वर्षीय शार्दूलला क्रिकेट करियरवर लक्ष केंद्रीत करायचे आहे आणि त्यामुळे तो पुढील वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर लग्न करणार आहे.
''मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या BKC येथील हॉलमध्ये शार्दूल ठाकूरच्या साखरपुड्याचा छोटासा कार्यक्रम होणार आहे. त्यात त्यानं मित्र व कुटुंबातील सदस्य अशा ७५ जणांनाच आमंत्रण दिले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो लग्न करणार आहे,''असे सूत्रांनी TOI ला सांगितले.
शार्दूल हा टीम इंडियाच्या तीनही फॉरमॅटमधील संघाचा सदस्य आहे. त्यानं ४ कसोटी, १५ वन डे व २४ -२० सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख गोलंदाज आहे.