नवी दिल्ली : शार्दुल ठाकूरकडे वेगवान गोलंदाजीत अष्टपैलुत्व सिद्ध करण्याची क्षमता आहे. हार्दिक पांड्या पाठीच्या दुखण्यामुळे गोलंदाजी करू शकत नव्हता, त्यावेळी शार्दुल मदतीला धावून आल्याचे मत भारतीय संघाचे गोलंदाजी कोच भरत अरुण यांनी व्यक्त केले. हार्दिक गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नसल्यामुळे बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी त्याचा विचार केलेला नाही. अशा स्थितीत पुढील पर्यायाचा शोध घेणे निवडकर्त्यांचे काम असले तरी, ठाकूरने स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली. अष्टपैलू बनू शकतो, हे शार्दुलने प्रत्यक्षात खरे ठरविले आहे. IPLमध्ये खेळण्यासाठी स्टार गोलंदाज सोडणार पाकिस्तानचं नागरिकत्व?; लंडनमध्ये होणार स्थायिक!
पांड्या २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यात अखेरचा कसोटी सामना खेळला. २०१९ च्या मोसमात तो पाठदुखीमुळे त्रस्त होता. अलीकडे आयपीएल सामन्यादरम्यान त्याच्या खांद्याला देखील दुखापत झाली. पांड्यासारख्या चांगल्या पर्यायाचा शोध घेणे काळाची गरज असल्याची कबुली देत अरुण म्हणाले, ‘हार्दिकमध्ये प्रतिभा आहे. त्याच्यासारखा गोलंदाज तयार करणे खरे तर कठीणच. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर संघात पुनरागमन करणे त्याला कठीण जात आहे.
इंग्लंड दौऱ्यात गोलंदाजांवरील भार कमी करण्यासाठी डब्ल्यूटीसी फायनलसह सहा कसोटीत रोटेशन धोरणाचा अवलंब केला जाईल, अशी माहितीदेखील अरुण यांनी दिली. राहुल द्रविड ऑस्ट्रेलियाच्या 'आयडिया' वापरून भारतातील युवा खेळाडूंना घडवतोय; ग्रेग चॅपल यांचा दावा
दोन कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या शार्दुलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रिस्बेन कसोटीत अर्धशतकी खेळी केली. शिवाय सात गडी बाद केले होते. आम्हाला गोलंदाजीत अष्टपैलू शोधण्याची गरज आहे. नियमितपणे भारतीय संघासोबत वास्तव्य असल्याने मी स्वत: स्थानिक सामन्यात अशा खेळाडूंचा शोध घेऊ शकत नाही. शार्दुलला इंग्लंड दौऱ्यात पुरेशी संधी मिळणार असल्याने गोलंदाजी अष्टपैलू म्हणून त्याच्या प्रतिभेत आणखी भर पडेल, अशी अपेक्षा आहे. ज्या पक्षासाठी भांडताय, तो मेलेल्या व्यक्तिला परत आणू शकत नाही; इरफान पठाण भडकला, कंगनाच्या नावाचाही उल्लेख केला
Web Title: Shardul Thakur Has Proved He Can Be An All-Rounder: Bharat Arun
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.