इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातल्या सामन्यात लोकेश राहुलला ( KL Rahul) दुखापत झाली. वेदनेने विव्हळताना त्याने मैदान सोडले. या सामन्यापूर्वी LSGच्याच ताफ्यातील जलदगती गोलंदाज जयदेव उनाडकत ( Jaydev Unadkat) याच्या खांद्याला दुखापत झाल्याचे समोर आले. या दुखापती गंभीर नसाव्या अशी प्रार्थना भारतीय चाहते करत आहेत. आयपीएल २०२३ नंतर भारताला ७ ते ११ जून या कालावधीत लंडन येथील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध WTC फायनल खेळायची आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी जाहीर केलेल्या भारतीय संघात लोकेश राहुल व जयदेव यांचा समावेश आहे. BCCI ने जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघातील जखमी खेळाडूंची संख्या ४ झाली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वीच रिषभ पंत, जसप्रीत बुमराह व श्रेयस अय्यर अशी दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी होतीच. त्यात लोकेश व जयदेव यांचा समावेश झाला आहे. त्याआधी शार्दूल ठाकूर व उमेश यादव यांनाही दुखापतीमुळे आयपीएल संघातून विश्रांती घ्यावी लागली आहे. ही दोघंही WTC Final संघातील सदस्य आहेत.
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत
ऑस्ट्रेलिया - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), स्कॉट बोलँड, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, अॅलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, मार्क हॅरिस, जोस हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिस, उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"