Shardul Thakur Shreyas Iyer, IPL 2022: "मुंबई से है तो शाना बन रहा है क्या"; शार्दूल ठाकूर-श्रेयस अय्यरमध्ये तू तू मैं मैं?

नक्की घडलं तरी काय ... वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 08:43 PM2022-04-10T20:43:06+5:302022-04-10T20:44:56+5:30

whatsapp join usJoin us
Shardul Thakur Shreyas Iyer Fighting or something check why he mentioned Mumbai IPL 2022 DC vs KKR | Shardul Thakur Shreyas Iyer, IPL 2022: "मुंबई से है तो शाना बन रहा है क्या"; शार्दूल ठाकूर-श्रेयस अय्यरमध्ये तू तू मैं मैं?

Shardul Thakur Shreyas Iyer, IPL 2022: "मुंबई से है तो शाना बन रहा है क्या"; शार्दूल ठाकूर-श्रेयस अय्यरमध्ये तू तू मैं मैं?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shardul Thakur Shreyas Iyer, IPL 2022 DC vs KKR Live: कोलकाता आणि दिल्ली यांच्यातील सामन्यात दिल्लीकर वरचढ ठरले. कुलदीप यादवचा बळींचा चौकार आणि खलील अहमदचे तीन बळी यांच्या बळावर दिल्लीच्या संघाने कोलकाताला ४४ धावांनी धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ने २१५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) १७१ धावांपर्यंतच मजल मारता आली. याच दरम्यान शार्दूल ठाकूर आणि श्रेयस अय्यर यांच्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या सामन्यापूर्वी कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर यांच्यात मजेदार संवाद झाला. या संभाषणाचा व्हिडिओ कोलकाता नाईट रायडर्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला. दोघांमधील संवाद-

श्रेयस- काय लॉर्ड, दिल्लीच्या कॅम्पमध्ये तू मस्त दिसतोयस.

शार्दुल- केकआर मध्ये तू पण चमकतोय. तुझ्या चेहऱ्यावर तेज आलंय.

श्रेयस- चल, आजच्या मॅचमध्ये तू एक सँपल बघायला तयार राहा. तुला तर माहिती आहे ब्रेबॉर्नवर माझं रेकॉर्ड कसं आहे...

शार्दुल-मुंबईचा आहेस तर शहाणा बनतोस का? माहिती आहे ना नेट्समध्ये मी तुला कशी गोलंदाजी केलीय.

श्रेयस- म्हणूनच तर त्याला नेट्स म्हणतात, भावा. आता मी आणि केकेआर तयार आहे.

दरम्यान, कोलकाताने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. दिल्लीने पृथ्वी शॉ (५१) आणि डेव्हिड वॉर्नर (६१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २१५ धावा केल्या. दिल्लीने दिलेल्या २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा नितीश राणा (३०) आणि कर्णधार श्रेयस अय्यरने (५४) धावा केल्या. कुलदीप यादवने मात्र एकाच षटकातील ३ विकेट्ससह एकूण ३५ धावांत ४ बळी टिपले.

Web Title: Shardul Thakur Shreyas Iyer Fighting or something check why he mentioned Mumbai IPL 2022 DC vs KKR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.