Shark Tank India Season 2: प्रसिद्ध बिझनेस रियालिटी शो शार्क टँक इंडियाचा दुसरा सीझन दाखल झाला आहे. शोची थीम स्टार्टअप आयडिया आणि त्यातील फंडिंग यावर आधारित आहे. या कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये भारतीय क्रिकेटर लोकेश राहुल ( KL Rahul) चा भाऊही त्याच्या व्यवसायाची कल्पना घेऊन पोहोचला होता. पण त्याला स्वतःच्या अपेक्षांवर खरे उतरता आले नाही. राहुलच्या भावाने कोणता बिझनेस प्लॅन आणला? कोणत्या जजने त्याला पाठिंबा दिला आणि कोणी हात वर केले, चला पाहुया...
बॉलिंग मशीन विकायला आणली अन्...
प्रतिक पलेनेथरा आणि विश्वनाथ या दोन तरुण व्यावसायिकांनी 'फ्री बॉलर' ही मशीन विकायला आणली होती. प्रतिक पलेनेथराने स्वत:ची ओळख भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलचा भाऊ अशी करून दिली. अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन हा प्रतिकच्या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. प्रतीक आणि विश्वनाथ हे त्यांच्या बॉलिंग मशीन व्यवसायासाठी निधी मिळविण्यासाठी आले होते. देशातील सर्वात स्वस्त बॉलिंग मशीन विकत असल्याचा दावा दोघांनी केला. त्यांनी ब्रँडमधील ७.५ टक्के इक्विटीसाठी ७५ लाख रुपयांची मागणी केली होती.
शार्कला जेव्हा चिन्हाबद्दल विचारले तेव्हा प्रतिकने प्रशिक्षित अंपायर होण्यापूर्वी तो १६ वर्षांखालील क्रिकेट संघात खेळल्याचे त्याने सांगितले. प्रतिकने स्वत:ला केएल राहुलचा चुलत भाऊ असल्याचे सांगितले. त्याने शार्कला त्याच्या मॉडेलचा डेमो दिला आणि किंमतीबद्दल बोलले. शार्कने त्याच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास नकार दिला. Shaadi.com चे संस्थापक अनुपम मित्तल म्हणाले की, तुम्ही विकत असलेल्या वस्तूंना बाजारपेठ नाही. तसेच गेली पाच वर्षे या व्यवसायात असूनही त्यांना बाजारपेठ समजू शकली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
प्रतीक पलेनेथरा आणि विश्वनाथ हे सध्या तोट्यात आहेत. प्रत्येक संघाची स्वतःची गोलंदाजी मशीन असते, त्यामुळे भारतामध्ये त्याला मागणी नसते. नमिता थापर यांनी 5% व्याजदराने 15% इक्विटीसाठी 25 लाख आणि 50 लाख रुपयांचे कर्ज देऊ केले असले तरी, प्रतिक आणि विश्वनाथ यांनी त्यावरून वाटाघाटी सुरू केली, त्यानंतर संतप्त झालेल्या नमिता यांनी तुमच्या व्यवसायात कोणताही व्यवसाय नसल्याचे सांगितले. मी मदत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही माझ्याशी वाटाघाटी करत आहात, मला अशी अपेक्षा नव्हती, असे त्या म्हणाल्या. दुसरा कोणताही मार्ग नसल्याने केएल राहुलच्या भावाला नमिता थापरची ऑफर स्वीकारावी लागली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Shark Tank India Season 2: KL Rahul’s Cousin Shares ‘Bowling Alley’ Idea On ‘Shark Tank India’, his business idea rejected
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.