ठळक मुद्दे 2016 साली मनोहर यांनी पहिल्यांदा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वतंत्रपणे सांभाळला होता.
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी पुन्हा एकदा भारताच्या शशांक मनोहर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही निवड बिनविरोध झाली आहे. 2016 साली मनोहर यांनी पहिल्यांदा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वतंत्रपणे सांभाळला होता. गेल्या काही वर्षांमध्ये मनोहर यांनी जगातिक क्रिकेटमध्ये बरेच बदल घडवून आणले, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आयसीसीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले.
अध्यक्षपदी पुन्हा एकदा विराजमान झाल्यावर मनोहर यांनी सांगितले की, " आयसीसीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विराजमान होणे, हा माझा बहुमानच आहे. आयसीसीच्या सदस्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि पाठिंबा दिला, त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. आगामी दोन वर्षांत आम्ही सारे एकजुटीने क्रिकेटचा अजून चांगला विकास कसा होईल, याबाबत निर्णय घेऊ. "
आयसीसीने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, " मनोहर हे 2016 साली आयसीसीचे पहिले स्वतंत्र अध्यक्ष झाले होते. त्यानंतर आता दोन वर्षांनी त्यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. "
Web Title: Shashank Manohar once again became ICC President
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.