Shashi Tharoor, IPL 2022: "याला 'टीम इंडिया'मध्ये घ्या! Jasprit Bumrah अन् 'हा' गोलंदाज मिळून प्रतिस्पर्ध्यांची वाट लावतील"; शशी थरूर यांनी केलं खास ट्वीट

शशी थरूर यांनी त्याच्या IPLमधील कामगिरीचे कौतुक केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 06:46 PM2022-04-18T18:46:15+5:302022-04-18T18:46:55+5:30

whatsapp join usJoin us
Shashi Tharoor praises Umran Malik for Best performance in ipl 2022 sunrisers hyderabad jasprit bumrah | Shashi Tharoor, IPL 2022: "याला 'टीम इंडिया'मध्ये घ्या! Jasprit Bumrah अन् 'हा' गोलंदाज मिळून प्रतिस्पर्ध्यांची वाट लावतील"; शशी थरूर यांनी केलं खास ट्वीट

Shashi Tharoor, IPL 2022: "याला 'टीम इंडिया'मध्ये घ्या! Jasprit Bumrah अन् 'हा' गोलंदाज मिळून प्रतिस्पर्ध्यांची वाट लावतील"; शशी थरूर यांनी केलं खास ट्वीट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shashi Tharoor Jasprit Bumrah Tweet: IPL 2022 च्या हंगामात अनेक नवनवे प्रतिभावान खेळाडू उदयास येताना दिसतात. यंदाच्या हंगामात आठऐवजी दहा संघांची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे जास्त खेळाडूंना खेळायची संधी मिळाली आहे. सर्वच खेळाडू आपली प्रतिभा दाखवण्यासाठी उत्सुक असून अनेक खेळाडू आपल्या कामगिरीने चाहत्यांच्या मनावर राज्य करतानाही दिसत आहेत. तशातच जम्मू एक्सप्रेस अशी ओळख असलेला सनराझयर्स हैदराबादचा उमरान मलिक (Umran Malik) याचे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी तोंडभरून कौतुक केले.

जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक सध्या चांगलाच फॉर्मात आहे. रविवारी उमरानने पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या सामन्यात २८ धावांत ४ बळी घेतले. त्याच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने (SRH) पंजाब किंग्जवर ७ गडी राखून विजय मिळवला. उमरानने डावाच्या शेवटच्या म्हणजे २०व्या षटकात एकही धाव न देता ३ बळी घेतले. या दमदार कामगिरीनंतर केवळ चाहते आणि क्रिकेटपटूच नाही, तर राजकारणीही त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते खासदार शशी थरूर यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून उमरानचे मनसोक्त कौतुक केले. उमरानची स्तुती करताना थरूर यांनी पोस्टमध्ये लिहिले- आम्हाला तो खेळाडू भारतीय जर्सीमध्ये लवकर दिसावा अशी इच्छा आहे. त्याच्याकडे किती अद्भुत प्रतिभा आहे. तो कुठेतरी हरवण्यापूर्वी त्याला लवकर संघात घ्या. त्याला इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी न्या. तो आणि जसप्रीत बुमराह मिळून इंग्लिश फलंदाजांची वाट लावतील.

दरम्यान, मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर उमरान मलिकने पंजाब किंग्जच्या डावातील शेवटचे षटक टाकले. या दरम्यान त्याने एकही धाव दिली नाही आणि एका रनआउटसह चार बळी घेतले. उमरान मलिकची हॅट्ट्रिक मिस झाली. पण संघाची मात्र हॅट्ट्रिक झाली. उमरानने ४ षटकात २८ धावांत ४ बळी घेतले.

 

Web Title: Shashi Tharoor praises Umran Malik for Best performance in ipl 2022 sunrisers hyderabad jasprit bumrah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.