नवी दिल्ली : भारतीय संघात नववर्षातील आपल्या अभियानाची सुरूवात श्रीलंकेविरूद्धच्या मायदेशातील मालिकेतून करणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 ट्वेंटी-20 आणि 3 वन डे सामने खेळवले जाणार आहेत. आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे, मात्र काही नव्या चेहऱ्यांना पुन्हा एकदा वगळल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. यातीलच एक नाव म्हणजे संजू सॅमसन. खरं तर सॅमसनला श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-20 संघात स्थान मिळाले आहे मात्र, वन डे संघातून त्याला वगळण्यात आले आहे. यावरूनच आता कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी बीसीसीआयला प्रश्न विचारला आहे.
शशी थरूर यांनी ट्विटच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत म्हटले, "@IamSanjuSamson बद्दलचे हे मीम केरळमध्ये सर्वत्र व्हायरल होत आहे. मला म्हणायचे आहे की मी याच्याशी सहमत आहे. भारताच्या वन डे संघामध्ये स्थान मिळविण्यासाठी त्याला आणखी काय करावे लागेल? @BCCI." संजू सॅमसनला भारताच्या वन डे संघात स्थान मिळवण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न शशी थरूर यांनी बीसीसीआयला विचारला आहे.
श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा ट्वेंटी-20 संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा वन डे संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
भारत विरूद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
- 3 जानेवारी, मंगळवार - पहिला ट्वेंटी-20 सामना, मुंबई
- 5 जानेवारी, गुरूवार - दुसरा ट्वेंटी-20 सामना, पुणे
- 7 जानेवारी, शनिवार - तिसरा ट्वेंटी-20 सामना, राजकोट
- 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
- 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
- 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"