कोलंबो : भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दुसºया कार्यकाळात खेळाडूंच्या तयारी करण्याच्या पद्धतीमध्ये थोडा बदल केला आहे.
हे आताच सुरू झाले असले तरी त्याचा प्रभाव मात्र ताबडतोब अनुभवाला येत आहे.
शास्त्री यांनी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यात फलंदाज आता फलंदाजीसाठी सज्ज असतात. फलंदाजी क्रमासोबत याचे काही देणे-घेणे नाही. मधल्या फळीतील फलंदाजांसाठी मैदानावर उतरण्यापूर्वी ‘वॉर्म अप’ करण्याच्या पद्धतीत बदल केला आहे.
गालेमध्ये शिखर धवन आणि अभिनव मुकुंद ही भारताची सलामीची जोडी संघातील अन्य सदस्यांपूर्वीच मैदानात दाखल झाली होती. याचा महत्त्वाचा उद्देश नेटमध्ये सराव करण्याची संधी मिळण्याचा होता. कारण भारताला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळण्याची शक्यता होती. कोहलीने नाणेफेक जिंंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चांगला वॉर्मअप करणाºया धवनने १६८ चेंडूंना सामोरे जाताना १९० धावांची खेळी केली.
सलामीवीर तंबूत परतले तोपर्यंत चेतेश्वर पुजाराने या बदललेल्या पद्धतीचा अवलंब केला. त्यानंतर विराट कोहलीने या पद्धतीचा वापर केला. गेल्या वेळच्या तुलनेत ही नवी पद्धत होती आणि संघातील खेळाडूंनी तिचे स्वागत केले. संघाने मैदानावरही ‘नंबर-वन’चा दर्जा सिद्ध करावा, यासाठी प्रशिक्षक शास्त्री यांनी ही नवी पद्धत सुरू केली. (वृत्तसंस्था)
Web Title: Shastri made changes in the practice practice of the Indian team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.