Join us  

प्लेअर ऑफ दी सीरिज म्हणून विंडीजच्या खेळाडूला मिळाली अमेरिकेत अर्धा एकर जमीन!  

रुथरफोर्डने केवळ २८ चेंडूत नाबाद ३९ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याच्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 6:28 PM

Open in App

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू शेफन रुथरफोर्डला ( Shefane Rutherford )  नुकत्याच झालेल्या ग्लोबल टी२० कॅनडा लीगमध्ये विचित्र पुरस्कार मिळाला. साउथपॉने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मॉन्ट्रियल टायगर्ससाठी धडाकेबाज खेळी खेळली आणि सरे जग्वार्सचा पराभव करून संघाला चषक उंचावण्यास मदत केली.

रुथरफोर्डने केवळ २८ चेंडूत नाबाद ३९ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याच्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याने राष्ट्रीय सहकारी आंद्रे रसेल ( ६ चेंडूत २० धावा) सोबत अफलातून फटकेबाजी करून मॉन्ट्रियलला आश्चर्यकारक पद्धतीने जेतेपद पटकावून दिले.   मॉन्ट्रियल टायगर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि सरे जग्वार्सला प्रथम फलंदाजी दिली. जग्वार्सने निर्धारित २० षटकांत ५ बाद १३० धावा केल्या. जग्वार्ससाठी जतिंदर सिंगने ५७ चेंडूत ५६ धावा केल्या. अयान खानने अवघ्या १५ चेंडूत २६ धावा केल्या. मॉन्ट्रियल टायगर्सच्या गोलंदाजांमध्ये, आयन खानने ४ षटकांत २१ धावा देत २ बळी घेतले. 

 प्रत्युत्तरात मॉन्ट्रियल टायगर्सने संयमाने १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकांत ५ बाद १३५ धावा केल्या. शेरफेन रुथररफोर्डच्या २९ चेंडूंत ३८ धावांच्या शानदार खेळीने त्यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला. त्याला पुरस्कार म्हणून अमेरिकेत अर्धा एकर जमीन दिली गेली आहे. 

टॅग्स :टी-20 क्रिकेटकॅनडा
Open in App