भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शिखर धवन आणि युझवेंद्र चहल यांना त्यांच्या विनोदी शैलीसाठी ओळखले जाते. टीम इंडियाचा गब्बर म्हणून ओळखला जाणारा धवन नेहमी नवनवीन व्हिडीओ शेअर करत असतो. धवनची ही विनोदी शैली चाहत्यांना भुरळ घालते. याबाबतीत फिरकीपटू युझी चहलदेखील कमी नाही. चहलही नेहमी हास्यास्पद व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. आता या जोडीने एक भन्नाट रील बनवून सर्वांचे लक्ष वेधले.
शिखर धवनने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले की, मला वाटले की, दरवाजाचा आवाज येत आहे. खरे तर धवन दरवाजा उघडून आत येताना दिसतो. मात्र, विचित्र आवाज कानावर पडताच दचकतो. पण दरवाजाच्या मागे असलेला चहल फोनवर बोलताना हसत असल्याचे दिसते.
अलीकडेच गब्बरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले. शिखर धवनने आपला पहिला कसोटी सामना १४ मार्च २०१३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. मोहालीच्या मैदानात डावाची सुरुवात करताना त्याने ८५ चेंडूत शतक झळकावून सर्वांनाच प्रभावित केले. पदार्पणाच्या सामन्यातील या झंझावाती खेळीसह पदार्पणाच्या कसोटीत जलद शतकी खेळी करण्याचा विक्रम धवनने आपल्या नावे केला. हा एक विश्विक्रम आजही कायम आहे. मोहाली कसोटीत त्याने १७४ चेंडूत १८७ धावांची खेळी केली होती.