Shikhar Dhawan breaks silence : शिखर धवनला वनडे संघाचे कर्णधारपद भूषवल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत भारतीय संघातून वगळण्यात आले. ३७ वर्षीय सलामीवीराने २०२३चा वर्ल्ड कप खेळण्याची आशा सोडलेली नाही. वन डे क्रिकेटमधील भारताच्या सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक असलेल्या धवनला बांगलादेश दौऱ्यावर ३ सामन्यांमध्ये खराब फलंदाजीचा फटका सहन करावा लागला. नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना विश्रांती दिली होती, तेव्हा धवनने संघाचे नेतृत्व केले होते. धवनच्या जागी संघात आलेला युवा फलंदाज शुभमन गिलने ७ सामन्यांत द्विशतकासह ४ शतकं झळकावत संधीचा पुरेपूर फायदा घेतला.
शिखर धवनने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ''उतार आणि उतार हा जीवनाचा एक भाग आहे. वेळ आणि अनुभवाने तुम्ही शिकता. यामुळे मला खूप ताकद मिळते. मी माझे सर्वोत्तम दिले. जर कोणी माझ्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा चांगले काम करत असेल तर मला कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे ती व्यक्ती संघात आहे आणि मी नाही. मी जिथे आहे तिथे मी खूप आनंदी आणि समाधानी आहे. मी खात्री करतो की माझी प्रक्रिया मजबूत आहे. अर्थात माझ्या संघात पुनरागमनाची संधी नेहमीच असते.''
धवन म्हणाला की, ''जर मला पुन्हा संघात संधी मिळाली तर ते माझ्यासाठी चांगले असेल. जर तसे झाले नाही तर ते देखील चांगले आहे. मी खूप काही मिळवले आहे आणि माझ्या यशावर मी आनंदी आहे. माझ्यासाठी जे आहे ते मला मिळेल, मी कोणत्याही गोष्टीसाठी हताश नाही.'' धवनने शेवटची कसोटी २०१८ मध्ये आणि ट्वेंटी-२० सामना २०२१ 21 मध्ये खेळला होता. धवनने ३४ कसोटी, १६७ वन डे आमि ६८ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"