Shikhar Dhawan Confirms Relationship With Sophie Shine : भारताचा माजी क्रिकेटर शिखर धवन पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तो एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला अन् या दोघांमध्ये प्रेमाचा खेळ सुरु असल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. आता खुद्द शिखर धवन याने गर्लफ्रेंडच्या समोर खास अंदाजात प्रेमाची कबुली दिलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गर्लफ्रेंडच नाव काय? नाव न सांगता धवनने हटके अंदाजात दिली प्रेमाची कबुली
एका कार्यक्रमातील शिखर धवनला पुन्हा एकदा प्रेमात पडण्यासाठी तयार आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर क्रिकेटरनं मी प्रेमात पडलोय, असा रिप्लाय दिला. लगेच त्याला गर्लफ्रेंडच नाव काय? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मी नाव सांगणार नाही असं म्हणत त्याने ज्या सोफीसोबत नाव जोडले गेले आहे तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची गोष्ट मान्य केली. अगदी हटके अंदाजात त्याने प्रेमाची कबुली दिली.
'गब्बर' पुन्हा पडलाय प्रेमात? कोण आहे ती मिस्ट्री गर्ल जी दुबईत शिखर धवनसोबत दिसली?
"मोस्ट ब्युटीफुल गर्ल...." असं म्हणत थेट गर्लफ्रेंडचा चेहराच दाखवला
"मोस्ट ब्युटीफुल गर्ल इन धिस रूम... इज माय गर्लफ्रेंड" असं म्हणत त्याने नव्या प्रेमाची हटके अंदाजात ओळख करून दिली. एवढ्यावर तो थांबला नाही तर 'कैमरामैन जल्दी फोकस करो...' या अंदाजात त्याने कार्यक्रमात उपस्थितीत असलेल्या आपल्या गर्लफ्रेंडकडे कॅमरा फिरवायलाही सांगितले. यावेळी सोफीच्या चेहऱ्यावरील भाव बघण्याजोगे होते.
पहिलं प्रेमही परदेशातलं संसार थाटला, पण...
२०१२ मध्ये धवनने वयाने १२ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या आएशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) हिच्यासोबत प्रेम विवाह केला होता. एवढेच नाही तर ती दोन मुलांची आई असताना या दोघांच्यात प्रेम फुललं अन् दोघांनी लग्न उरकून घेतले होते. ५ आक्टोबर २०२३ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता धवनला पुन्हा एकदा नवे प्रेम मिळाले आहे.
कोण आहे धवनची गर्लफ्रेंड सोफी?
सोफी शाइन ही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवेळी धवनसोबत दिसली होती. याआधीही ती धवनसोबतच्या फ्रेममध्ये स्पॉट झाली होती. शिखर धवनची सुंदर गर्लफ्रेंड आयर्लंडची नागरिक आहे. ती एक आयरिश प्रोडक्ट कन्सल्टंट च्या रुपात काम करते. सोफीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन फॅमिलीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात धवनचीही झलक पाहायला मिळाली होती.
Web Title: Shikhar Dhawan Confirms Relationship With Sophie Shine Former Indian Cricketer Finds Love Again Know About His Girlfriend
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.