Shikhar Dhawan: "हे खूप निराशाजनक आहे", टॉयलेटमध्ये ठेवलेले जेवण खेळाडूंना दिल्याबद्दल शिखर धवनने केली कारवाईची मागणी

उत्तर प्रदेशमधील सहानपुर जिल्ह्यात एक लाजीरवाणा प्रकार घडला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 04:04 PM2022-09-22T16:04:54+5:302022-09-22T16:06:21+5:30

whatsapp join usJoin us
Shikhar Dhawan demand action from CM Yogi Adityanath for serving food kept in toilet to players | Shikhar Dhawan: "हे खूप निराशाजनक आहे", टॉयलेटमध्ये ठेवलेले जेवण खेळाडूंना दिल्याबद्दल शिखर धवनने केली कारवाईची मागणी

Shikhar Dhawan: "हे खूप निराशाजनक आहे", टॉयलेटमध्ये ठेवलेले जेवण खेळाडूंना दिल्याबद्दल शिखर धवनने केली कारवाईची मागणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील सहारनपुर जिल्ह्यात एक लाजीरवाणा प्रकार घडला होता. येथील डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियममध्ये 17 वर्षांखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले गेले होते आणि 300 हून अधिक खेळाडू तेथे आले होते. दरम्यान, भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवननेउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कबड्डीपटूंना दिल्या जाणार्‍या शौचालयात ठेवलेले अन्न प्रकरणी कारवाई करण्याची विनंती केली. उत्तर प्रदेशातील राज्यस्तरीय स्पर्धेत कबड्डीपटूंना शौचालयामध्ये ठेवलेले अन्न खाताना पाहून 36 वर्षीय धवनने नाराजी व्यक्त केली आहे. 

शिखर धवनने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "राज्यस्तरीय स्पर्धेत कबड्डीपटूंना शौचालयात ठेवलेले जेवण दिले जाणे हे अत्यंत निराशाजनक आहे. मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेश सरकारला विनंती करतो की याकडे लक्ष द्यावे आणि योग्य ती कारवाई करावी." मात्र या प्रकरणावर कारवाई करत सहारनपुरचे जिल्हा क्रीडा अधिकारी अनिमेश सक्सेना यांना या अहवालानंतर निलंबित करण्यात आले आहे. 

अतिरिक्त मुख्य सचिव क्रीडा नवनीत सहगल यांनी सांगितले की, अनिमेश सक्सेनाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. राज्य सरकारने एडीएम वित्त आणि महसूल रजनीश कुमार मिश्रा यांना या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

पावसामुळे शौचालयात ठेवले होते जेवण 
16 सप्टेंबरला येथील डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियममध्ये अनेक जिल्ह्यांतून खेळाडू सहभाग घेण्यासाठी आले होते. त्यांना दिले गेलेले जेवण अत्यंत खराब होते. डाळ, भाज्या व भात कच्चाच होता. व्हिडीओत हे जेवण शौचालयामधील जमीनीवर ठेवलेले पाहायला मिळत आहे आणि नाईलाजास्तव खेळाडूंना ते खावे लागले होते. या प्रकारानंतर क्रीडा अधिकाऱ्यांनी त्यांचे मत मांडले होते, पावसामुळे जेवळ आतमध्ये ठेवावे लागल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. 


 

Web Title: Shikhar Dhawan demand action from CM Yogi Adityanath for serving food kept in toilet to players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.