मुंबई : भारतीय संघाचा सलामीवर शिखर धवन हा मैदानावर आणि मैदानाबाहेर आपल्या विनोदी वर्तनाने नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेत आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्या फॅन्सचे चांगले मनोरंजन होत असते. धवनच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टमुळे त्याची पुन्हा चर्चा आहे. ही चर्चा आहे ती धवनच्या नामकरणाची... भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि धवन यांनी एकमेकांना टोपण नाव देताना बारसं केलं.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत धवनचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. या मालिकेत पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. इंग्लंड मालिकेतील निराशाजनक कामगिरी पाहता धवनला संघाबाहेर बसावे लागले. या फावल्या वेळेत धवन इंस्टाग्रामवर अॅक्टीव्ह झाला आहे.
धवनने नुकताच एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला. त्यावर हरभजनने 'डाकू' असे नामकरण केले. त्यावर धवन याने रिप्लाय देताना 'जग्गा जट' असे नाव दिले.