नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या गैरहेजरीत संघ शिखर धवनच्या नेतृत्वात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आज मालिकेतील पहिला सामना होणार असून सामन्याच्या पूर्वसंध्येलाच धवनने आपल्या टीकाकारांना चांगलेच प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या फॉर्मबद्दल कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. असं धवननं म्हटल.
दरम्यान, भारतीय संघातील धवनच्या जागेवर टांगती तलवार असल्याची मागील काही कालावधीपासून चर्चा होती. मात्र अचानक त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवल्यानंतर क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. धवनने म्हटले की, तो जवळपास १० वर्ष टिकाकारांचा सामना करत आला असून आता त्याला यामुळे काहीच फरक पडत नाही.
रोहितच्या गैरहजेरीत धवन सांभाळणार धुरा वेस्टइंडिजविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. धवनला विंडिजविरूद्धच्या पहिल्या सामन्याच्या आधी टीकाकारांबद्दल विचारणा केली असता मला याने काहीच फरक पडत नसल्याचे म्हटले. "यामध्ये वेगळं काय आहे, आता या सगळ्याला १० वर्षे झाली आहेत. लोक बोलत राहतील आणि मी प्रदर्शन करत राहीन. जर मी त्यांचं ऐकत राहिलो असतो तर आज इंथ नसतो." अशा शब्दांत धवनने 'गब्बर' अवतारात टीकाकारांना सुनावले.
"माझ्याकडे चांगला अनुभव आहे, त्यामुळे मला याची अजिबात चिंता वाटत नाही. मी स्वतःचे विश्लेषण करत राहतो आणि माझ्या कामगिरीत सुधारणा करत असतो. मी खूप सकारात्मक असून माझ्या मते सकारात्मकता म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. मी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून माझ्यात ही गोष्ट आहे आणि मी काहीतरी साध्य केलं आहे म्हणूनच मी आज इथं उभा आहे. मला माझी सकारात्मकता काही युवा खेळाडूंना द्यायची आहे." असं कर्णधार धवनने स्पष्ट केलं.
भारत विरूद्ध वेस्टइंडिज एकदिवसीय मालिका २२ जुलै - पहिला सामना - पोर्ट ऑफ स्पेन२४ जुलै - दुसरा सामना - पोर्ट ऑफ स्पेन२७ जुलै - तिसरा सामना - पोर्ट ऑफ स्पेन
भारतीय संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन
शिखर धवन, ईशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, आवेश खान, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल