शिखर धवन सांभाळणार भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व; BCCI लवकरच निर्णय जाहीर करणार 

दोन वर्षांपासून ट्वेंटी-२० संघातून बाहेर बसलेला शिखर धवनकडे अचानक संघाचे नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याची बातमी समोर येतेय. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 10:15 AM2023-06-30T10:15:11+5:302023-06-30T10:15:45+5:30

whatsapp join usJoin us
Shikhar Dhawan likely to lead the team at Asian Games 2023 and VVS Laxman to be the coach: BCCI Sources | शिखर धवन सांभाळणार भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व; BCCI लवकरच निर्णय जाहीर करणार 

शिखर धवन सांभाळणार भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व; BCCI लवकरच निर्णय जाहीर करणार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धेत मागील १० वर्ष बाजी मारता आलेली नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकूडन आपला लाजीरवाणा पराभव झाला. त्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जातोय आणि कसोटी व वन डे संघाची घोषणाही केली गेली. पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी लवकरच संघ जाहीर केला जाणार आहे. पण, त्याआधी दोन वर्षांपासून ट्वेंटी-२० संघातून बाहेर बसलेला शिखर धवनकडे अचानक संघाचे नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याची बातमी समोर येतेय. 

भारतीय संघाचे आमागी लक्ष्य हे वन डे वर्ल्ड कप स्पर्धा हे आहे. तत्पूर्वी भारताला आशिया चषक स्पर्धेची ट्रॉफीही खुणावतेय, पण याच दरम्यान भारताला आणखी दोन जेतेपदं जिंकण्याची संधी आहे. चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या पुरूष व महिला संघ पाठवण्याची तयारी BCCI करतेय. BCCIने भारताचा पुरुष व महिला संघ आशियाई स्पर्धेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. Asian Games 2023मध्ये ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळवलं जाणार आहे आणि २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा चीनमध्ये पार पडणार आहे.

यापूर्वी २०१० व २०१४च्या आशियाई स्पर्धेत क्रिकेट खेळलं गेलं, परंतु बीसीसीआयने संघ पाठवणे गरजेचे नाही समजलं. आशियाई स्पर्धा मागच्या वर्षीच होणार होती, परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलली गेली. जकार्ता येथे २०१८ साली पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत क्रिकेट बाद करण्यात आले होते. आतापर्यंत दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला असताना पुरुषांमध्ये एकदा श्रीलंका आणि एकदा बांगलादेशने सुवर्णपदक जिंकले आहे. दुसरीकडे, महिलांमध्ये पाकिस्तानने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे.  


आशियाई स्पर्धेसाठीच्या पुरुष क्रिकेट संघाचे नेतृत्व अनुभवी शिखर धवनकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी तसे PTI ला सांगितले आहे. धनवच्या नेतृत्वाखाली भारताची दुसरी फळी आशियाई स्पर्धेसाठी पाठवली जाईल.  

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Shikhar Dhawan likely to lead the team at Asian Games 2023 and VVS Laxman to be the coach: BCCI Sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.