Join us  

Shikhar Dhawan Mayank Agarwal, IPL 2022 MI vs PBKS: पंजाबने केली मुंबईची 'गब्बर' धुलाई! विजयासाठी दिले १९९ धावांचे आव्हान

पंजाबच्या दोन्ही सलामीवीरांनी ठोकली अर्धशतके

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 9:31 PM

Open in App

पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) गोलंदाजांची तुफान धुलाई केली. कर्णधार मयंक अग्रवाल, सलामीवीर शिखर धवन यांची अर्धशतके आणि युवा फलंदाज जितेश शर्माची फटकेबाजी याच्या बळावर पंजाबने मुंबईला १९९ धावांचे आव्हान दिले. सलामी जोडीच्या ९७ धावांच्या भागीदारीच्या वेळी पंजाब २०० पार सहज मजल मारेल अशी अपेक्षा होती. पण मुंबईच्या गोलंदाजांनी १२व्या षटकानंतर केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे पंजाबला द्विशतकी मजल मारता आली नाही. 

प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या सलामीवीरांनी मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. कर्णधार मयंक अग्रवाल आणि शिखर धवन दोघांनीही अर्धशतके ठोकली. मात्र शतकी सलामी देण्यास त्यांची जोडी ३ धावांनी कमी पडली. मयंक अग्रवाल ३२ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा करून बाद झाला. पाठोपाठ जॉनी बेअरस्टो १२, लियम लिव्हिंगस्टोन २ धावा काढून माघारी परतला. शिखर धवनने मात्र ५० चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ६० धावांची शानदार खेळी केली. याशिवाय शेवटच्या टप्प्यात जितेश शर्माने (३०*) फटकेबाजी करत पंजाबला मोठी धावसंख्या उभारून दिली.

मुंबईकडून बेसिल थंपीने २ तर उनाडकट, बुमराह आणि मुरूगन अश्विनने १ बळी टिपला. आजच्या सामन्यासाठी संधी देण्यात आलेल्या टायमल मिल्स मात्र एकही गडी बाद करता आला नाही. विशेष म्हणजे, सर्व फलंदाजांनी आपापली ४ षटके पूर्ण केली. त्यात जसप्रीत बुमराहला सर्वात कमी मार (२८ धावा) पडला.  

टॅग्स :आयपीएल २०२२शिखर धवनमयांक अग्रवालमुंबई इंडियन्स
Open in App