'गब्बर इज बॅक'; २ वेळा 'गोल्डन बॅट' पटकवणाऱ्या शिखर धवनची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एन्ट्री

बॅक टू बॅक दोन हंगाम गाजवणारा एकमेव क्रिकेटर आहे शिखर धवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:47 IST2025-02-13T14:42:29+5:302025-02-13T14:47:31+5:30

whatsapp join usJoin us
Shikhar Dhawan Named ICC Champions Trophy 2025 Ambassador | 'गब्बर इज बॅक'; २ वेळा 'गोल्डन बॅट' पटकवणाऱ्या शिखर धवनची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एन्ट्री

'गब्बर इज बॅक'; २ वेळा 'गोल्डन बॅट' पटकवणाऱ्या शिखर धवनची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एन्ट्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shikhar Dhawan, ICC Champions Trophy 2025 : भारताचा माजी क्रिकेटर शिखऱ धवन याची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एन्ट्री झाली आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. शिखर धवन याने २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे यावेळी तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळाडूच्या रुपात नाही तर एका खास भूमिकेत दिसणार आहे. पाकिस्तानच्या यजमानपदाखाली होत असलेल्या यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याला ॲम्बेसिडरचा मान मिळाला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

चार दिग्गजांच्या यादीत शिखरला मिळाले स्थान 
 
२०१७ नंतर यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात आलेली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९ ते ९ मार्च या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवण्यात येणार असून उर्वरित सामने पाकिस्तानमधील वेगवेगळ्या स्टेडियमवर रंगणार आहेत. या स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) चार ॲम्बेसिडरची नियुक्ती केलीये. यात शिखर धवनच्या नावाचा समावेश आहे.  

धवनशिवाय या माजी खेळाडूंची लागली वर्णी
 
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शिखर धवनशिवाय पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद, ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन आणि न्यूझीलंडचा टिम साउदी यांचा समावेश आहे. हे चार ॲम्बेसिडर  प्रत्येक सामन्यादरम्यान स्टेडियमवर उपस्थितीत असतील. एवढेच नाही तर स्पर्धेच्या सामन्याचे खास विश्लेषणही करताना दिसतील. गत हंगामात पाकिस्तानच्या संघाने फायनलमध्ये भारताला पराभूत करत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. या संघाचे नेतृत्व सरफराज अहमदनं केले होते. त्यामुळे पाकनं त्याला खास मान दिल्याचे दिसते. 

धवनने व्यक्त केली खास भावना

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा भाग होणं ही एक खास अनुभव देणारा क्षण असतो. आगामी स्पर्धेत ॲम्बेसिडरच्या रुपात या स्पर्धेशी जोडलं जाणं सन्मानजनक वाटते. ही स्पर्धा माझ्यासाठी खूपच खास आहे. कारण या स्पर्धेतील अविस्मरणीय क्षण आजही मनात घर करून आहेत, अशा शब्दांत शिखर धवनने नव्या भूमिकेसाठी उत्सुक असल्याचे मत व्यक्त केले आहे.  
 
शिखर धवनने दोन वेळा मिळवलीये  'गोल्डन बॅट'

शिखर धवनने आपल्या कारकिर्दीत दोन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळला आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळा त्याने आपली छाप सोडत या स्पर्धेतील गोल्डन बॅटचा पुरस्कार पटकवल्याचे पाहायला मिळाले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला 'गोल्डन बॅट' पुरस्कारासह सन्मानित  करण्यात येते. धवनने २०१३ आणि २०१७  या हंगामात मिळून धवनच्या खात्यात या स्पर्धेत ७०१ धावांची नोंद आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कोणत्याही भारतीयाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. बॅक टू बॅक गोल्डन बॅट पकवणारा तो एकमेव क्रिकेटर आहे.
 

Web Title: Shikhar Dhawan Named ICC Champions Trophy 2025 Ambassador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.