Shikhar Dhawan IPL 2022: 'तू कोहिनूर गमावलास...', जेव्हा शिखर धवनला मुलीनं केलं होतं रिजेक्ट; 'गब्बर'नं सांगितला किस्सा

शिखर धवन आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये चांगल्या फॉर्मात दिसत आहे. पण मैदानाबाहेरही धवन नेहमीच चर्चेत असतो. नुकतंच त्यानं एका मुलाखतीत एक गुपीत उघड केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 06:06 PM2022-04-06T18:06:19+5:302022-04-06T18:06:44+5:30

whatsapp join usJoin us
shikhar dhawan on proposing a girl interview ipl 2022 punjab kings | Shikhar Dhawan IPL 2022: 'तू कोहिनूर गमावलास...', जेव्हा शिखर धवनला मुलीनं केलं होतं रिजेक्ट; 'गब्बर'नं सांगितला किस्सा

Shikhar Dhawan IPL 2022: 'तू कोहिनूर गमावलास...', जेव्हा शिखर धवनला मुलीनं केलं होतं रिजेक्ट; 'गब्बर'नं सांगितला किस्सा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शिखर धवन आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये चांगल्या फॉर्मात दिसत आहे. पण मैदानाबाहेरही धवन नेहमीच चर्चेत असतो. नुकतंच त्यानं एका मुलाखतीत एक गुपीत उघड केलं आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2022) पंजाब किंग्ज संघ चांगली कामगिरी करत आहे. मैदानाबाहेरही खेळाडूंची मजा सुरूच असते. टीम इंडिया आणि पंजाब किंग्जचा 'गब्बर' शिखर धवनही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 

"मी एकदा एका मुलीला प्रपोज केलं तेव्हा तिने मला नकार दिला होता. मी काही खास दिसतही नव्हतो, तरीही मी तिला तू एक कोहिनूर गमावला आहेस असं म्हटलं होतं", असा एक किस्सा शिखर धवननं मुलाखतीत सांगितला आहे. पंजाबचा संघ बसमधून प्रवास करत असताना शिखर धवनने ही मुलाखत दिली. यादरम्यान अनेक चाहते रस्त्यातच बसचा पाठलाग करत होते. यादरम्यान बस शेजारून जाणाऱ्या एका कारमधून तरुणी शिखर धवनचा फोटो मोबाइलमध्ये टिपण्याचा प्रयत्न करत होती. शिखर धवननं यावर एक गाणंही म्हटलं.

शिखरनं यावेळी त्याच्या चाहत्यांबाबतही माहिती दिली. चाहत्यांच्या काही आठवणी शेअर केल्या. त्याच्यासारखे दिसणारे चार-पाच चाहते आहेत. त्यांनी अंगावर माझ्या नावाचे, चेहऱ्याचे टॅटू बनवले आहेत. काहींनी माझ्या सर्व शतकांचे आकडे आणि कौटुंबिक फोटो देखील जपून ठेवले आहेत, असं शिखरनं सांगितलं. 

शिखर धवनने IPL 2022 मध्ये तीन सामने खेळले आहेत, यात त्यानं एकूण ९२ धावा केल्या आहेत. शिखर धवनची सर्वाधिक धावसंख्या ४३ आहे. पंजाब किंग्जकडून सर्वाधिक धावा केलेल्या फलंदाजांमध्ये शिखर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्जने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३ सामने खेळले असून, दोन जिंकले आहेत आणि एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

Web Title: shikhar dhawan on proposing a girl interview ipl 2022 punjab kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.