नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर शिखर धवन आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो मैदानातही उतरला आहे. मैदानात उतरल्यार धवनने एक टिक-टॉक व्हिडीओ बनवला होता. आता व्हिडीओ चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
विश्वचषकातील सामन्यात शतक झळकावल्यावर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. धवन विश्वचषकात खेळेल, असे संघ व्यवस्थापनाला वाटत होते. पण धवनची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला विश्वचषकाला मुकावे लागले होते. आता धवन थोडा फिट झाला आहे. पण तो पूर्णपणे फिट झालेला नाही. युवराजने धवनला एक चॅलेंज दिले होते, ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी धवनने दुखापतीनंतर पहिल्यांदाच हातामध्ये बॅट घेतली होती आणि त्याने हे चॅलेंज पूर्ण केले आहे. युवराजने नेमके धवनला कोणते चॅलेंज दिले होते.
युवराजने धवनसह मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी महान फलंदाज ब्रायन लारा आणि ख्रिस गेल यांना ‘बॉटलकॅप चॅलेंज’ दिले होते.
‘बॉटलकॅप चॅलेंज’ आहे तरी काय...सध्याच्या घडीला ‘बॉटलकॅप चॅलेंज’ टिक-टॉक व्हिडीओची धुम आहे. या ‘बॉटलकॅप चॅलेंज’मध्ये तुम्हाला बाटलीचे झाकण उडवायचे असते. तुम्ही किती कल्पकपद्धतीने झाकण उडवता, या गोष्टीला महत्व दिले जाते.
हा पाहा धवनचा खास व्हिडीओ