नवी दिल्ली : भारतीय संघ नववर्षात आपल्या अभियानाची सुरूवात मायदेशात श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून करणार आहे. या मालिकेसाठी मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघ जाहीर केला आहे. ट्वेंटी-20 आणि वन डे दोन्ही मालिकांसाठी यजमान संघ 2 वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात असणार आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवनला वन डे संघातून वगळण्यात आले आहे, तर फॉर्मात नसलेल्या ऋषभ पंतलाही वगळण्यात आले आहे. निवडकर्त्यांनी संघ जाहीर करण्यापूर्वीच धवनबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.
बड्या खेळाडूंचा पत्ता कटश्रीलंकेविरुद्ध ज्या वन डे संघाची निवड करण्यात आली आहे, त्यात दीर्घकाळापासून संघासाठी सलामी देणाऱ्या शिखर धवनचे नाव नाही. तसेच रिषभ पंतला देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या दोघांना वगळण्याचे कारण 1 खेळाडू आहे. ईशान किशन यष्टिरक्षक आणि सलामीवीर या दोघांचीही पोकळी चांगल्या प्रकारे भरून काढतो. बांगलादेशविरुद्ध ईशानने रोहित शर्माला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागेवर वन डे सामन्यात द्विशतक झळकावून इतिहास रचला. ईशान किशन सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज असल्यामुळे भारतीय संघाची पोकळी भरून काढू शकतो. त्यामुळे रिषभ पंत आणि शिखर धवन यांना संघात स्थान मिळाले नसल्याचे बोलले जात आहे.
श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी ट्वेंटी-20 संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी वन डे संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
भारत विरूद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
- 3 जानेवारी, मंगळवार - पहिला ट्वेंटी-20 सामना, मुंबई
- 5 जानेवारी, गुरूवार - दुसरा ट्वेंटी-20 सामना, पुणे
- 7 जानेवारी, शनिवार - तिसरा ट्वेंटी-20 सामना, राजकोट
- 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
- 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
- 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"