Join us  

टीम इंडियाचे नेतृत्व विराटकडेच! धवनचे पुनरागमन, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ जाहीर

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 2:20 PM

Open in App

मुंबई -  आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. तीन  टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांसाठीच्या भारतीय संघाची घोषणा आज निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केली. विश्वचषकादरम्यान दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच कसोटी संघामध्ये यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने पुनरागमन केले आहे. तर विंडीज दौऱ्यातून माघार घेणाऱ्या धोनीला पर्याय म्हणून ऋषभ पंतची निवड करण्यात आली आहे. 

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी  एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीला कर्णधार विराट कोहली हासुद्धा उपस्थित होता.  येत्या ३ ऑगस्टपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेने भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.  

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ  - 

टी-20  - विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा,  वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार,  खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी 

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ  -

वनडे -  विराट कोहली ( कर्णधार),  रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक),  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी 

 

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ  -

कसोटी  - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबीसीसीआय